शहरं
Join us  
Trending Stories
1
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
2
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
3
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा झालमुरी स्टॉल, पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
4
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
5
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
6
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
7
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
8
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
9
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
10
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
11
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
12
IAS Aastha Singh : प्रेरणादायी यशोगाथा! आजोबांनी दाखवलं स्वप्न; अवघ्या २१ व्या वर्षी कोचिंगशिवाय आस्था बनली IAS
13
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
14
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
15
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
16
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
17
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
18
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
19
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
20
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षाच्या मुलासह पायी प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 12:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : कोरोनाला रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन झाल्याने जिल्ह्यासह अनेक ठिकाणी राहणारे अनेक कुटुंब आपापल्या गावी मिळेल ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : कोरोनाला रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन झाल्याने जिल्ह्यासह अनेक ठिकाणी राहणारे अनेक कुटुंब आपापल्या गावी मिळेल त्या वाहनाने अथवा पायीच घरी परतत आहेत. डेडीयापाडा (गुजरात) ते शहादा असा पायी प्रवास करीत एक गरीब कुटुंब तीन वर्षाच्या मुलासह शहाद्यात पोहोचले.मध्य प्रदेशातील उमरखली (खरगोन) येथील टिकाराम मानकर व त्याची पत्नी परिता मानकर हे रोजगारासाठी डेडीयापाडा येथे गेले होते. मुलासाठी मागितलेला उतरण्यासाठी पैशांची गरज असल्याने डेडियापाडा येथे काही दिवस त्यांनी कामाची शोधाशोध केली. थोड्या दिवसानंतर विटांच्या पजावावर काम करण्याचे त्यांनी ठरवले. सर्व काही सुरळीत होईल या आशेत असतानाच देशात कोरोना विषाणूने थैमान घातले. त्यातच देशभरात लॉकडाऊन झाल्याने रोजगार कधी उपलब्ध होईल याची शाश्वती नसल्याने व खिशात पैसे नसल्याने उपासमारीचा सामना या तिघांना करावा लागत होता. प्रवासासाठी सुविधा नसल्याने त्यांनी पायी प्रवास करीत शहादा गाठले. शहादा येथे आल्यानंतर हे कुटुंब शासकीय विश्रामगृह परिसरात बसले असताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे यांच्यावर लक्ष गेले. विचारपूस केल्यानंतर डेडियापाडापासून पायीच आल्याचे त्यांना समजले. त्यानंतर मुख्य अभियंता जे.एस. कादरी, कमलाकर साळुंखे, सचिन पगारे यांनी साहित्य उपलब्ध करून त्यांची आरोग्य तपासणी केली. त्यानंतर त्यांना शासकीय विश्रामगृहाच्या खोलीत राहण्यासाठी व्यवस्था करून जेवण व इतर गोष्टींची सुविधा करण्यात आली. ही बाब स्वयंसेवी संस्थांना माहित पडल्याने त्यांच्याकडूनही सोय करण्यात येत आहे. या कुटुंबाची पुन्हा आरोग्य तपासणी करून त्यांच्या मूळ गावी सोडण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.