शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

विनय गौडा यांची सातारा जि.प.च्या सीईओपदी बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 12:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांची सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी ...


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांची सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली झाली आहे. १७ महिन्यांपूर्वी त्यांची तळोदा प्रकल्प अधिकारी पदावरून येथे बदली झाली होती. गौडा यांच्या जागी अद्याप कुणाचीही नियुक्ती झालेली नाही. गौडा यांनी आपल्या कार्यकाळात घरकुल योजना, झिरो पेडन्सी, पाणी पुरवठा योजनांची कामे चांगली केली. आंतरजिल्हा शिक्षक बदलीच्या राज्य समन्वयक म्हणून देखील त्यांनी काम पाहिले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या बदलीचे आदेश गुरुवारी दुपारी येथे प्राप्त झाले. गौडा यांनी १९ फेब्रुवारी २०१९ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार स्विकारला होता. त्या आधी ते तळोदा येथे प्रकल्प अधिकारी व सहायक जिल्हाधिकारी म्हणून दिड वर्ष काम पाहिले होते.
गौडा यांनी आपल्या दीड वर्षाच्या कार्यकाळात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून घरकुल योजनेवर भर दिला होता. योजना प्रभावीपणे राबविणारी नंदुरबार जिल्हा परिषद राज्यात अव्वल ठरली होती. याशिवाय पाणी नमुने संकलन व तपासणीत देखील जिल्हा परिषद राज्यात सतत दोन वर्ष अव्वल ठरली आहे. झिरो पेडन्सीसाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतर जिल्हा व जिल्हाअंतर्गत बदलीच्या धोरणाचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या राज्यस्तरीय समितीत ते प्रमुख अधिकारी होते. यंदाच्या आॅनलाईन बदल्यांचे मुख्य समन्वयक म्हणून त्यांनी काम पाहिले.
त्यांच्या कार्यकाळात सर्वाधिक काळ हा आचारसंहितेत गेला होता. त्यात लोकसभा, विधानसभा व जिल्हा परिषद निवडणुका झाल्याने सहा ते सात महिने आचारसंहितेत गेले. असे असतांनाही त्यांनी जास्तीत जास्त निधी खर्च करण्यावर व योजना राबविण्यावर देखील विनय गौडा यांनी भर दिला होता.
पदभार प्रभारी अतिरिक्त सीईओंकडे
४अतिरिक्त सीईओंचे पदही रिक्त आहे. हा पदभार ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ यांच्याकडे आहे. आता सीईओंचा प्रभारी पदभारही त्यांच्याकडे राहणार आहे. नवीन सीईओ कुणाची नेमणूक होते याकडे आता लक्ष लागून आहे.