शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
6
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
7
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
11
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
12
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
13
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
14
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
15
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
16
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
17
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
18
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
19
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
20
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
Daily Top 2Weekly Top 5

व्हेंटीलेटरची मात्र प्रतिक्षा करावी लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 12:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनासोबत लढण्यासाठी साधनसामुग्रींनी युक्त व्हावे म्हणून जिल्हा प्रशासनाने आरोग्य विभागाला दोन कोटी रुपयांचा निधी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनासोबत लढण्यासाठी साधनसामुग्रींनी युक्त व्हावे म्हणून जिल्हा प्रशासनाने आरोग्य विभागाला दोन कोटी रुपयांचा निधी दिला आहे़ या निधीतून तातडीने विलगीकरण कक्षांसाठी व्हेंटीलेटर खरेदी केले जाणार असून या व्हेंटीलेटरची दीर्घ काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे़जिल्हा रुग्णालयात तयार करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षात दोन व्हेंटीलेटर आहेत़ सोबत जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयांकडून १४ व्हेंटीलेटरर्स अधिग्रहीत करण्यात आले आहेत़ गरज पडल्यास या व्हेंटीलेटरर्सचा उपयोग केला जाणार आहे़ परंतू आरोग्य सेवेवर ताण पडू नये यासाठी जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड यांनी आपत्कालिन परिस्थितीसाठी जिल्हा वार्षिक योजनेंंतर्गत दोन कोटींचा निधी व्हेंटीलेटर खरेदीसाठी देण्यात आला आहे. चार दिवसांपूर्वी मंजूर करण्यात आलेल्या निधीनंतर जिल्हा रुग्णालयाने मुंबई येथील आरोग्य साहित्य व मशिनरी पुरवठादारांसोबत संपर्क करुन साधारण २० व्हेंटीलेटरची नोंद केली आहे़ परंतू संबधित पुरवठादाराकडे राज्यातील इतर ठिकाणाहून व्हेंटीलेटर्सची मागणी नोंदवली गेली असल्याने नंदुरबार जिल्ह्याला तातडीने मशिन पुरवठा होण्याबाबत साशंकता व्यक्त करण्यात आली आहे़ व्हेंटीलेटर तयार करणाऱ्या कंपन्यांसोबत शासनाने थेट बोलणे केले असले तरी त्यांचे उत्पादन कमी असल्याने जिल्ह्याच्या वाट्याला तातडीने व्हेंटीलेटर येण्याची शक्यता कमीच असल्याची माहिती आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आली आहे़याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ आऱडी़भोये यांना संपर्क केल्यावर त्यांनी सांगितले की, प्रशासनाने दिलेल्या निधीतून व्हेंटीलेटर खरेदीसाठी पाठपुरावा सुरु आहे़ मुंबई येथे बोलणे सुरु असून येत्या काळात आपल्याला चांगल्या दर्जाचे व्हेंटीलेटर प्राप्त होण्याची शक्यता आहे़दरम्यान आरोग्य यंत्रणेकडे जिल्हा रुग्णालयासह सात ठिकाणच्या कोरोना विलगीकरण कक्षात काम करणाºया डॉक्टरांसाठी मुबलक साहित्य असल्याचा दावा जिल्हा रुग्णालय प्रशासनाने केला आहे़