शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
5
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
6
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
7
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
8
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
9
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
10
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
11
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
12
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
13
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
14
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
15
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
16
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
18
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
19
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
20
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात बेमोसमी पावसाच्या सरींनी उडाली तारांबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 12:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अवकाळी पावसाने पुन्हा दणका दिल्याने शेतमाल वाचविण्यासाठी शेतक:यांची एकच धांदल उडाली. जिल्ह्यातील अनेक भागात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अवकाळी पावसाने पुन्हा दणका दिल्याने शेतमाल वाचविण्यासाठी शेतक:यांची एकच धांदल उडाली. जिल्ह्यातील अनेक भागात मध्यम तर काही भागात तुरळक पाऊस झाला. दिवसभर ढगाळ वातावरण होते. परिणामी गेल्या तीन ते चार दिवसांपासून उकाडा आणि ऊनमुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. दरम्यान, येत्या 24 तासात पुन्हा पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पावसामुळे शेती नुकसानीच्या पंचनाम्यांना काहीसा व्यत्यय आला.जिल्ह्यातील अनेक भागात गुरुवारी पहाटेपासूनच पावसाची रिपरिप सुरू होते. दुपार्पयत अनेक भागात मध्यम ते तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला. अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आल्याने नागरिकांनी आणि शेतक:यांनीही आधीच उपाययोजना करून ठेवलेल्या होत्या. असे असले तरी या पावसामुळे अनेक भागात शेतमाल वाचविण्यासाठी कसरत झाल्याचे दिसून आले. शेतमाल झाकण्यासाठी धावपळशेतांमध्ये सध्या सोयाबीन, मका, बाजरी काढून ठेवण्यात आली आहे. दोन आठवडय़ांपूर्वी झालेल्या पावसात त्याचे नुकसान झालेले होते. जेमतेम आता काही अंशी त्यातील उत्पादन मिळणार असल्यामुळे ते पावसापासून वाचविण्यासाठी शेतक:यांची धावपळ उडाली. काहींनी आधीच हे पीक मळणी करून घरात ठेवले. परंतु कापूस, मिरची, पपई या पिकांना या पावसाचा फटका बसणार आहे. अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने शेतक:यांमध्ये भितीचे वातावरण आहेच. परंतु चक्रीवादळाची तीव्रता कमी झाल्याने अतिवृष्टीची शक्यताही कमी झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शेतक:यांना दिलासा मिळाला आहे.धान्य व मिरचीचे नुकसानबाजार समितीत सध्या खरीप धान्याची आवक ब:यापैकी सुरू आहे. मिरचीची आवक देखील सुरू झाली असून ती वाळविण्यासाठी पथारींवर टाकली जात आहे. अशातच पावसाची रिपरिप सुरू असल्याने धान्य वाचविण्यासाठी व्यापा:यांची धावपळ उडाली. ताडपत्रीद्वारे झाकून आणि काही व्यापा:यांनी थेट शेडमध्ये धान्य ठेवून पावसापासून वाचविण्याचा प्रय} केला.जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरण होते. गेल्या तीन ते चार दिवसांपासून तापमान वाढले होते. उकाडा देखील वाढला होता. ऑक्टोबर हिटचा अनुभव नोव्हेंबर महिन्यात येत होता. परंतु गुरुवारी सकाळपासूनच पावसाच्या तुरळक सरी आणि ढगाळ वातावरण यामुळे तापमानात घट झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला.

जिल्ह्यातील नुकसानीचा पंचनाम्याचे काम सुरू असताना पुन्हा 6 व 7 नोव्हेंबर रोजी पाऊस झाला. या पावसामुळे पंचनाम्याच्या कार्यात व्यत्यय आला असला तरी कुठलाही बाधित शेतकरी सुटणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले. तर झालेल्या पंचनाम्यांचे चावडीवाचन करण्यासाठी दवंडीद्वारे संदेश द्यावा, जिल्ह्यात पंचनामा केलेल्या शेतीचा संयुक्त अहवाल कृषी विभागाकडे सादर करण्याचे आवाहन देखील डॉ.भारुड यांनी केले.