शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

एमआयएमच्या दोन नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:29 IST

शहादा नगरपालिकेची नोव्हेंबर महिन्यात निवडणूक होणार आहे. गेल्या निवडणुकीत शहादा नगरपालिकेत एमआयएम पक्षाचे चार नगरसेवक मोठ्या मतांच्या फरकाने विजयी ...

शहादा नगरपालिकेची नोव्हेंबर महिन्यात निवडणूक होणार आहे. गेल्या निवडणुकीत शहादा नगरपालिकेत एमआयएम पक्षाचे चार नगरसेवक मोठ्या मतांच्या फरकाने विजयी झाले होते. याचसोबत स्वीकृत नगरसेवकही विजयी झाला होता. पालिकेची आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आता अनेक हौशेनवशे कार्यकर्ते सोयीच्या पक्षात सहभागी होऊ लागले आहेत. शहादा नगरपालिका निवडणुकीत एमआयएम पक्षाकडून विजय झालेले नगरसेवक वाहीद पिंजारी, स्वीकृत नगरसेवक ॲड. दानीश पठाण व नगरपालिका शालेय शिक्षण समितीच्या सभापती सायराबी लियाकतअली सैयद यांचे पुत्र मुजफ्फर अली सैयद यांच्यासोबत ॲड.माजित सैयद, रियाज सैयद, मोईन पटवा, मुन्शी, इमरान वायरमन, इम्रान मंडपवाले, तैसिफ बेग, काशीक शेख, अजहर खालीपा, जाकीर पठाण, रिजवान बागवान, राजा बागवान, एजाज सैयद, शकील बेलदार आदी कार्यकर्त्यांनी जलसंपदामंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी आमदार उदेसिंग पाडवी यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

शहादा शहर व तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी तसेच येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होणाऱ्या सर्वच निवडणुकीत हिरीरीने भाग घेऊन पक्ष कार्यकर्त्यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मुजफ्फरअली सैयद यांनी पक्ष प्रवेशानंतर सांगितले.