शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
3
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
4
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
6
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
7
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
8
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
9
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
10
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
11
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
12
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
13
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
14
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
15
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
16
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
17
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
18
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
19
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
20
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...

कृती आराखडा समन्वयासाठी प्रतिनिधींसाठी प्रशिक्षण वर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 12:42 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : रोहयोचे लेबर बजेट, नियोजन व सामूहिक वन हक्क प्राप्त गावांच्या कृती आराखड्यावर चर्चेसाठी २७ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : रोहयोचे लेबर बजेट, नियोजन व सामूहिक वन हक्क प्राप्त गावांच्या कृती आराखड्यावर चर्चेसाठी २७ गावांच्या लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्यासह वन व्यवस्थापन समिती सदस्य यांचे प्रशिक्षण घेण्यात आले़ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बिरसामुंडा सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांनी मार्गदर्शन केले़शासनाने रोजगार हमी योजनेंंतर्गत गावे समृद्ध व्हावीत यासाठी शेती आणि नैसर्गिक संसाधनांच्या व्यवस्थापनावर भर देत २०२०-२१ च्या वार्षिक नियोजनाचे कृती आराखडे तयार करण्याचे आदेश दिले आहेत़ त्यानुसार त्या-त्या गावात जाणीव जागृती करत त्यांच्या सहभागातून गावात घ्यावयाच्या कामांसाठी हे कृती आराखडे बनवले जाणार आहेत़ यात धडगांव, तळोदा, नंदुरबार व अक्कलकुवा तालुक्यात लोकसमन्वय प्रतिष्ठानतर्फे २७ सामूहिक वनहक्क प्राप्त गावांमध्ये वनव्यवस्थापन व संवर्धनासाठी कृती आराखडे बनवण्याचे काम ही सुरू करण्यात आले आहे़ या पार्श्वभूमीवर या २७ गावांचे सरपंच, ग्रामसेवक, रोजगारसेवक वन विभागाचे वनक्षेत्रपाल, कृषी विभाग व रोजगार हमी विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे एकत्रित प्रशिक्षण घेण्यात आले़ प्रसंगी प्रतिभा शिंदे यांनी रोजगार हमी योजना व त्या अनुषंगारे निघालेले नवीन शासन आदेश, सामूहिक वनहक्क क्षेत्रात करावयाची व्यवस्थापन व संवर्धन कामे याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले़रोहयोचे उपजिल्हाधिकारी शाहूराज मोरे यांनीही मार्गदर्शन केले़ जिल्हा परिषद सदस्य गणेशदादा पराडके यांनीही प्रशिक्षणात सहभाग नोंदवला़ या वेळी या गावांचा परिपूर्ण आराखडा बनवून या गावांना समृद्ध बनवू असा संकल्प करण्यात आला़