शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
4
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
5
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
6
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
7
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
8
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
9
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
10
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
11
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
12
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
13
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
14
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
15
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
16
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
17
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
18
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
19
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
20
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
Daily Top 2Weekly Top 5

सातपुड्यात आजही गाढवांवर वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:56 IST

सातपुड्यातील अतिदुर्गम भागात रस्ते, पाणी आणि वीज यासारख्या मूलभूत सुविधा देण्यात शासनाला अपयश आले आहे. त्यामुळे या भागात दळणवळणाचे ...

सातपुड्यातील अतिदुर्गम भागात रस्ते, पाणी आणि वीज यासारख्या मूलभूत सुविधा देण्यात शासनाला अपयश आले आहे. त्यामुळे या भागात दळणवळणाचे प्रमुख साधन म्हणून गाढवच महत्त्वपूर्ण ठरत आहे. या भागात पोहोचण्यात कुचकामी ठरलेल्या शासकीय यंत्रणेपेक्षा गाढवच आपला साथी असे म्हणण्याची वेळ अतिदुर्गम भागातील आदिवासींवर आली आहे. धडगाव तालुक्यातील तोरणमाळपासून थेट मध्य प्रदेश सीमेपर्यंत सातपुड्यातील दुर्गम भागात आजही दळणवळणाच्या साधनांचा अभाव आहे. वीज तर दूर, परंतु चालण्यासाठी रस्तेही नसल्याने डोंगरदऱ्यांमधून त्यांना स्वत:च वाट शोधत जावे लागते. अशा परिस्थितीमुळे या भागात नेमणूक करण्यात आलेले ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी, कृषी सहायक, आरोग्य कर्मचारी यांचे दर्शन केवळ आठवडे बाजाराच्याच दिवशी होते. या सरकारी मंडळींना तोरणमाळमध्ये गाठण्यासाठी आदिवासींना दमछाक करावी लागते. या विपरित परिस्थितीत सर्वच शासकीय यंत्रणांकडून दुर्लक्षित झालेल्या या दुर्गम भागातील आदिवासींना रस्त्याअभावी गाढवांची मोलाची साथ लाभत आहे.

डोंगरदऱ्यांमधून अन्नधान्याची वाहतूक, विहिरीवरून पाणी आणणे, बियाणे-खत आणणे असो, एवढेच काय शालेय पुस्तकांच्या वाहतुकीचेही काम या भागात गाढवांकडूनच करून घ्यावे लागते. रुग्णाला परिसरातील आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठीही गाढवासोबत बांबुलन्स उपयुक्त ठरत आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे हालअपेष्टा भोगणाऱ्या या भागातील आदिवासी जनतेला शासकीय यंत्रणेपेक्षा गाढवाची वाहतूकच अधिक विश्वासाची वाटत आहे. त्यामुळे डोंगरात राहणाऱ्या आदिवासी कुटुंबीयांना दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तू आपल्या घरी पोहोचविण्यासाठी वाहतुकीसाठी रस्ते नसल्याने गाढवच उपयुक्त ठरत असल्याचे चित्र आहे. यामुळे देश डिजिटल युगाकडे वळत असताना, सातपुड्यातील आदिवासी जनता मात्र यापासून कोसो दूर आहे.

ऊन-वाऱ्यात पायीवारी

सातपुड्यातील डोंगरदऱ्याच्या भागात राहणाऱ्या आदिवासी कुटुंबीयांना दळणवळणासाठी रस्तेच नसल्याने, त्यांना बाजारहाट घेऊन जाण्यासाठी गाढवाचा वापर करावा लागतो. यासाठी सुमारे १५ ते २० किलोमीटरहूनही अधिक अंतर ऊन-वाऱ्यात पायी प्रवास करीत आपले घर गाठावे लागते. हालअपेष्टा भोगाव्या लागत असल्याची प्रतिक्रिया सातपुड्यातील अतिदुर्गम भागातील नागरिकांनी दिली.