शहरं
Join us  
Trending Stories
1
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
2
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
3
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा झालमुरी स्टॉल, पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
4
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
5
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
6
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
7
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
8
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
9
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
10
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
11
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
12
IAS Aastha Singh : प्रेरणादायी यशोगाथा! आजोबांनी दाखवलं स्वप्न; अवघ्या २१ व्या वर्षी कोचिंगशिवाय आस्था बनली IAS
13
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
14
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
15
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
16
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
17
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
18
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
19
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
20
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
Daily Top 2Weekly Top 5

बाहेरगावाहून आले २२ हजार नागरिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 12:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाला थोपवण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने दक्षता म्हणून घोषित केलेल्या लॉकडाऊन काळातही जिल्ह्यात तब्बल ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाला थोपवण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने दक्षता म्हणून घोषित केलेल्या लॉकडाऊन काळातही जिल्ह्यात तब्बल २३ हजार नागरिक परतले आहेत़ येथील मूळ रहिवासी असलेल्या या नागरिकांचे मोठ्या शहरांमध्ये हाल होण्याची शक्यता असल्याने त्यांनी गावाची वाट धरली होती़ या सर्वांच्या तपासण्या पूर्ण करण्यात आल्या असून एकासही कोरोनासारखी लक्षणे असलेले किरकोळ आजार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे़देशात कोरोनाचे संकट घोंघावू लागल्यानंतर जिल्ह्यातून नोकरी आणि व्यवसायानिमित्त पुणे, मुंबई, नाशिक यासह राज्यातील इतर मोठी शहरे आणि देशातील इतर शहरांमध्ये निवास करणाऱ्यांनी जिल्ह्याची वाट धरली होती़ मिळेल त्या वाहनाने या ‘भूमीपुत्रां’चे लोंढे जिल्ह्यात येत होते़ या लोंढ्यांमधून कोरोनाचा फैलाव होण्याची भिती असल्याने पोलीस दलाने जिल्हा आणि राज्य सीमेवर त्यांची तपासणी केी होती़ या सर्वांची सिमेवर तपासणी करण्यात आल्यानंतर घरीही त्यांची योग्य पद्धतीने तपासणी करण्यासाठी जिल्ह्यात आरोग्य विभाग, महसूल आणि जिल्हा परिषदेच्या पथकांनीही भेटी दिल्या होत्या़ यातून या सर्वांची प्रकृती चांगली असल्याची माहिती असून एकातही कोरोनाची लक्षणे किंवा तत्सम आजारही नसल्याची माहिती देण्यात आली आहे़ जिल्ह्यातील सर्व सहा तालुक्यात आलेल्या नागरिकांवर लक्ष ठेवण्यासाठी ग्रामसेवक, आरोग्यसेवक, आशा, अंगणवाडी सेविका आणि तलाठी यांच्या पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे़ तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनात कार्यरत असलेल्या या पथकांकडून दर दिवशी घेतल्या जाणाºया आढाव्यामुळे रोज सद्यस्थिती समोर येत आहे़ दरम्यान जिल्ह्यात बाहेरगावाहून येणाऱ्यांचे लोंढे थांबलेले नसून दरदिवशी नागरिक मिळेल त्या मार्गाने येत असल्याची माहिती देण्यात आली आहे़ पोलीस प्रशासनाकडून ९ ठिकाणी जिल्ह्याच्या सीमा सील केल्यानंतर येणाºया नागरिकांच्या लोंढ्यामुळे चिंता असली तरी त्यांच्या आरोग्य तपासणीला प्रथम प्राधान्य दिले जात आहे़

आरोग्य विभागाने बाहेरगावाहून आलेल्या २२ हजार ८०० नागरिकांच्या आतापर्यंत तपासण्या पूर्ण केल्या आहेत़यात नवापुर येथील एकास सर्दी, खोकला आणि ताप असल्याने त्याला जिल्हा रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते़ नवापुरचे गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी त्याच्या कुटूंबाची भेट घेत माहिती जाणून घेतली असता, संबधित व्यक्ती हा पुणे येथून आल्याचे सांगण्यात आले होते़ त्याचे स्वॅब नमुने पुणे येथे एनआयव्हीकडे पाठवण्यात आले होते़ दक्षता म्हणून त्याच्या संपर्कात आलेल्या पाच जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे़प्रशासनाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार गेल्या १० दिवसात नंदुरबार तालुक्यात ८ हजार ३७२, शहादा ६ हजार ३६१, तळोदा ८३५, अक्कलकुवा ३ हजार ७००, नवापुर तालुक्यात १ हजार ८८२ तर धडगाव तालुक्यात १ हजार ५६० बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांच्या तपासण्या करुन त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे़ या २२ हजार ८०० पैकी एकासही कोरोनासदृश लक्षणे नसून त्यांच्या प्रकृतीवर ग्रामसमित्या लक्ष ठेवून आहेत़दक्षता म्हणून आरोग्य विभागाकडून तालुकानिहाय किमान ५० पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे़ हे पथक दरदिवशी क्वारंटाईन नागरिकांची चौकशी करुन अहवाल आरोग्य विभागाकडे देत आहेत़शहादा तालुक्यात ३ हजार ३४६ नागरिकांचे दक्षता म्हणून क्वारंटाईन करण्यात आले होते़ यात २० जण हे परदेशातून आले असल्याची माहिती देण्यात आली होती़ सर्व २० जणांच्या तपासण्या पूर्ण करण्यात आल्यानंतर या सर्वांची प्रकृती सुरळीत असल्याची माहिती देण्यात आली आहे़दरम्यान शुक्रवारपासून जिल्ह्यात आरोग्य विभागाच्यावतीने आशा आणि अंगणवाडी सेविका यांचे पथक घरोघरी पुन्हा सर्वेक्षण करणार असून त्यांच्याकडून किरकोळ आजारींची माहिती संकलित होणार आहे़