शहरं
Join us  
Trending Stories
1
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
2
Election Results 2026 LIVE: "बंगालच्या विकासासाठी भाजप आता कोणतीही कसर सोडणार नाही"; ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींची प्रतिक्रिया
3
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
4
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
5
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
6
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
7
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
8
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
9
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
10
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
11
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
12
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
13
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
14
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
15
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
16
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
17
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
18
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
19
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
20
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
Daily Top 2Weekly Top 5

संचारबंदीतही चोरट्यांची होतेय चांदी, हजारोंचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 11:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : संचारबंदीच्या काळात चोरट्यांनी हातसफाई सुरू ठेवली आहे. नंदुरबारातील गोडावून फोडून इलेक्ट्रीक सामान तर डाब, ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : संचारबंदीच्या काळात चोरट्यांनी हातसफाई सुरू ठेवली आहे. नंदुरबारातील गोडावून फोडून इलेक्ट्रीक सामान तर डाब, ता.अक्कलकुवा येथे दुकान फोडून रोख रक्कम व सोन्याचे दागीने चोरट्यांनी लंपास केले. याप्रकरणी नंदुरबार व मोलगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संचारबंदीमुळे सध्या सर्वत्र शुकशुकाड आहे. ही संधी साधत चोरटे हातसफाई करीत आहेत. नंदुरबारातील सुमित विजयकुमार गुरुबक्षाणी, रा.सिंधी कॉलनी यांच्या मंगळ बाजारातील इलेक्ट्रीक वस्तुंच्या गोडावूनमधून चोरट्यांनी ३५ हजारांचे साहित्य चोरून नेले. त्यात एलईडी बल्ब, ईस्त्री व बॅटरी यांचा समावेश आहे. लॉकडाऊनपासून हे गोडावून बंदच असल्यामुळे चोरी नेमकी कधी झाले हे स्पष्ट होऊ शकले नाही. याबाबत सुमित विजयकुमार गुरुबक्षाणी यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास जमादार ठाकरे करीत आहे.दुसरी घटना डाबचा मौलीपाडा, ता.अक्कलकुवा येथे घडली. गावात दिलीप भामटा वसावे यांचे किराणा दुकान आहे. दुकानाच्या खिडकीचे गज वाकवून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. दुकानातील गल्ल्यातून रोख ११ हजार रुपये व साडेसहा हजार रुपयांचे सोन्याचे दागीने असा ऐवज चोरून नेला.सकाळी ही बाब लक्षात आल्यावर दिलीप वसावे यांनी मोलगी पोलिसात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार राजेश पाटील करीत आहे.