शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
4
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
5
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
6
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
7
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
8
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
9
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
10
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
11
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
12
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
13
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
14
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
15
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
16
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
17
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
18
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
19
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
20
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार जिल्ह्याच्या दृष्टीने यंदाचा उन्हाळा तापदायक राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:56 IST

भारतीय हवामान विभागाने यंदाचा उन्हाळी हंगाम मार्चपासून मे महिन्यापर्यंत तापमान कसं राहील, याच्या अंदाजाचा वेध घेणारं एक पत्रक नुकतंच ...

भारतीय हवामान विभागाने यंदाचा उन्हाळी हंगाम मार्चपासून मे महिन्यापर्यंत तापमान कसं राहील, याच्या अंदाजाचा वेध घेणारं एक पत्रक नुकतंच प्रसिद्ध केलं. देशातील दक्षिणेकडची काही राज्य वगळता यंदा उन्हाच्या झळा अपेक्षेपेक्षा जास्तच तीव्र असतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मार्च, एप्रिल आणि मे या महिन्यांमध्ये यंदा उत्तर, ईशान्य, वायव्य भारत आणि पूर्वेकडच्या काही भागांमध्ये सरासरीपेक्षा अधिक कमाल तापमान तर हिमालयाच्या पायथ्याशी असलेले प्रदेश, ईशान्य आणि दक्षिणेकडच्या काही राज्यांमध्ये या कालावधीतलं किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त असेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यंदा ओडिशा, छत्तीसगडसह महाराष्ट्रातल्या कोकण विभागाला यंदा तीव्र उन्हाळ्याचा इशारा देण्यात आला आहे.

तापमानाचा अंदाज जास्त वर्तवल्याने शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकास, फळबागांना केळी, पपई, भाजीपाला पिकांना गरजेनुसार योग्य अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करावी. जेणेकरून पिकांना उष्माचा ताण बसणार नाही आणि जमिनीचे तापमान नियंत्रित राहील. कमी पाणी लागणाऱ्या पिकांची आणि कमी कालावधीत येणाऱ्या वाणांची निवड करावी, आंतरमशागतीची कामे वेळेवर करावीत, तण व्यवस्थापन करावे, पिकात प्लास्टिक आच्छादनाचा वापर करावा, जेणेकरून मातीतील पाण्याचे बाष्पीभवन कमी होऊन ओलावा जास्त वेळ टिकून राहील, अशी माहिती कृषी हवामान शास्त्रज्ञ सचिन फड यांनी दिली.

हवामानात होणारे बदल तसेच दर मंगळवारी आणि शुक्रवारी विस्तृत हवामान अंदाज आणि कृषी सल्ला जिल्हा कृषी हवामान केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार यांच्याकडून whatsapp व इतर माध्यमातून देण्यात येतो, तो मिळवण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ८२७५००९६५९/८८०५५११४८८ या नंबरवर व्हॅाट्‌स ॲपवर मेसेज करावा, तसेच जिल्ह्याचा हवामान अंदाज आणि कृषी सल्ला पाहण्यासाठी मोबाइलच्या प्ले स्टोरमधून “मेघदूत” ॲप डाऊनलोड करावे, अशी माहिती डॉ. हेडगेवार सेवा समिती, कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबारचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख राजेंद्र दहातोंडे यांनी दिली.