शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

अरुंद रस्त्यामुळे उसाचा ट्रक उलटून अपघात चालक जखमी; चिंचपाडा-बंधारे रस्त्यावरील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 15:17 IST

  लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर :  गुजरात राज्यातील नवसारी साखर कारखान्यात बंधारे येथील शेतकरी आपला १३ टन ऊस भरून ...

  लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर :  गुजरात राज्यातील नवसारी साखर कारखान्यात बंधारे येथील शेतकरी आपला १३ टन ऊस भरून ट्रक घेऊन जात असताना नवापूर तालुक्यातील बंधारे गावात अरुंद रस्त्याने ट्रक अनियंत्रित होऊन उलटून अपघात झाला. यात चालक जखमी झाला असून त्याला सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. नवापूर तालुक्यातील अरुंद व खराब रस्त्यामुळे अपघात होत आहे. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाने उपायोजना करण्याची गरज आहे.                          नवापूर तालुक्यातील बंधारे गावात अरुंद रस्ता आहे. पुलाजवळ हा ट्रक उलटून अपघात झाला आहे. गेल्यावर्षी अशाच पद्धतीने उसाचे ट्रक व ट्रॅक्टर याठिकाणी उलटून अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तरीही संबंधित विभाग कुठलीही उपाययोजना करताना दिसून येत नाही. बिलबारा ते चिंचपाडा रस्त्याची प्रचंड दूरवस्था झाली आहे. जागोजागी मोठमोठे खड्डे पडल्याने शेतकऱ्यांना आपला ऊस कारखान्यापर्यंत नेण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.                 १३ टन उसाने भरलेला ट्रक उलटल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. जेसीबीच्या सहाय्याने ऊस दुसर्‍या वाहनात भरण्यात आला आणि जेसीबीच्या मदतीने ट्रक उचलण्यात आला. काही काळ या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. नवापूर तालुक्यातील ग्रामीण रस्त्याचे रुंदीकरण करणे गरजेचे आहे.