शहरं
Join us  
Trending Stories
1
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
2
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
3
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा झालमुरी स्टॉल, पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
4
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
5
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
6
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
7
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
8
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
9
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
10
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
11
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
12
IAS Aastha Singh : प्रेरणादायी यशोगाथा! आजोबांनी दाखवलं स्वप्न; अवघ्या २१ व्या वर्षी कोचिंगशिवाय आस्था बनली IAS
13
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
14
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
15
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
16
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
17
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
18
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
19
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
20
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर येथून तब्लिगी जमाएतमध्ये सहभाग घेतलेले ११ जण नवापुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 12:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापुर : सोलापूर येथील तब्लिग जमाअतमधून परतलेल्या नवापुर तालुक्यातील ११ जणांना सावधगिरीचा उपाय म्हणुन शहरातील विलगीकरण ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापुर : सोलापूर येथील तब्लिग जमाअतमधून परतलेल्या नवापुर तालुक्यातील ११ जणांना सावधगिरीचा उपाय म्हणुन शहरातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असुन त्यांचेवर आरोग्य विभागाचे पथक बारीक लक्ष ठेवून आहे. बुधवारी रात्री हे ११ जण नवापुरात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी पोलीसांसह याठिकाणी भेटी देत तातडीने कारवाई केली़दिल्लीस्थित तब्लिग जमाअतच्या मुख्यालयात अडकुन पडलेल्या भाविकांपैकी काहींना कोरोना विषाणुची लागण झाल्याचे उघडकीस आल्यानंतर मुख्यालयातुन देशातील विविध ठिकाणी जमाअत मधे निघालेल्या भाविकांबद्दल चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. तालुक्यातील ११ जण देखील सोलापूर येथे जमाअतमधे गेले होते. चिंचपाडा येथील दोन व नवापुर शहरातील ९ जणांचा त्यात समावेश होता. ९ पैकी दोन जण चालक होते. हे ११ जण दिल्ली गेले नसले तरी त्यांनी राज्यातील सोलापुर भागात ४० दिवस काढले. राज्यात कोरोनाची भिती असल्याने व त्यातच कोरोनाच्या काळातच हे ११ जण परजिल्ह्यात राहुन आल्याने बुधवारी रात्री ते नवापुर येथे परतल्याचे प्रशासनास समजताच गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, सहाय्यक पोलीस निरिक्षक दिगंबर शिंपी व आरोग्य विभागाचे सहकारी कर्मचारी यांनी त्या ११ जणांना विलगीकरण कक्षात दाखल केले.आरोग्य विभागाचे एक डॉक्टर, एक प्रयोगशाळा तंत्रज्ञ व इतर तीन कर्मचारी यांच्या निगराणीखाली त्या सर्वांना ठेवण्यात आले असुन त्यांचे परिक्षण केले जात आहे. त्या पैकी कुणालाही सर्दी, खोकला किंवा कोरोनासारखे कुठलेही लक्षण नसले तरी विलगीकरण कक्षात सर्वांना स्वतंत्र ठेवण्यात आले असल्याची माहिती नंदकुमार वाळेकर यांनी दिली. दोन तीन दिवस त्यांच्या वैद्यकीय चाचण्यांचे अहवाल पाहुन त्यांचे रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावे की नाही याचा निर्णय घेतला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.

जमाअत मधे जाण्याची परंपरा तशी पार पुरातन आहे. स्वखर्चाने व्यक्ती तीन दिवस, चाळीस दिवस, चार महिने किंवा पुर्ण वर्षभरासाठी जमाएत मध्ये जातात. परमेश्वराचा संदेश देत पाच वेळची नमाज अदा करणे, इस्लाम धमार्तील पाचही फर्जचा अंमल यासह मनुष्याचे जीवन पैंगबरांनी दाखवुन दिलेल्या मागार्नेच जगण्याचा संदेश जमाअतमधे जाणारे बांधव देतात. जमाअतमधे स्वत:चा स्वयंपाक स्वत: तयार करणे व इतर कामेही स्वत:लाच करावी लागतात. वाममागार्पासुन स्वत:चा बचाव करण्यासाठी जमाअत हे उत्तम माध्यम मानले गेले आहे. तीन दिवसाची जमाअत त्या त्या तालुक्यातच आयोजित होते. चाळीस दिवसाची जमाअत राज्यातच वा लगतच्या मात्र एकाच राज्यात काढली जाते. चार महिने किंवा वर्षभराची जमाअत लांबवरच्या राज्यात किंवा वेळप्रसंगी परदेशातही काढली जाते. तीन दिवस व चाळीस दिवसाच्या जमाअतचे नियोजन तालुका व जिल्हा स्तरावरुनच केले जाते तर इतर कालावधीसाठीचे नियोजन राज्य व राष्ट्रीय स्तरावरुन करण्यात येते.