शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

ब्राrाणपुरीत डेंग्यूसदृश रुग्ण आढळल्याने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 12:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राrाणपुरी : शहादा तालुक्यातील ब्राrाणपुरी येथील अंगणवाडी क्रमांक एकजवळ राहणा:या एका दोन वर्षीय बालिकेला डेंग्यू आजाराची ...

लोकमत न्यूज नेटवर्कब्राrाणपुरी : शहादा तालुक्यातील ब्राrाणपुरी येथील अंगणवाडी क्रमांक एकजवळ राहणा:या एका दोन वर्षीय बालिकेला डेंग्यू आजाराची लागण झाल्याने ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. गावात तातडीने स्वच्छता करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.ब्राrाणपुरी येथील अंगणवाडी क्रमांक एक, तीन व चारच्या परिसरात अस्वच्छता निर्माण झाली आहे. तसेच रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू  असल्याने गटारी तुंबल्याने अस्वच्छता निर्माण झाली आहे. त्यामुळे डास-मच्छराचा मोठय़ा प्रमाणावर  प्रादुर्भाव झाला आहे. गेल्या 15 दिवसांपासून बालके हिवताप, सर्दी, खोकला, पांढ:या पेशी, तांबडय़ा पेशी कमी होत होणे आदी आजारांनी त्रस्त झाले आहेत. गावातील अंगणवाडी क्रमांक एकजवळ राहणारी उर्वशी गोविंदा राजपूत (2 वर्षे) या बालिकेला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले असता हिला डेंग्यूसदृश्य आजाराची लागण झाल्याचे निदान झाले आहे. या बालिकेवर खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नियमित साफसफाई होत नसल्याने व  दूषित पाणीपुरवठा होत असल्याने रोगराई पसरून बालकांसह आबालवृद्धांना साथीच्या आजारांची लागण होत आहे.धूळ फवारणीची मागणीब्राrाणपुरी येथे डास-मच्छरांचा प्रादुर्भाव झाल्याने डेंग्यूसदृश रुग्ण आढळून आल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत. गावात फोगिंग मशीन आणून धूळ फवारणी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.अंगणवाडी एकजवळील उघडी विहीर धोकेदायकअंगणवाडी क्रमांक एकजवळील उघडय़ा विहिरीमुळे डासांचा मोठय़ा प्रमाणावर प्रादुर्भाव होत असल्याने  या विहिरीमधेच डेंग्यूचे डास निर्माण झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. जवळच अंगणवाडी असल्याने पालक आपल्या मुलाना अंगणवाडीत पाठवायला तयार होत नाहीत. संबंधितांनी या विहिरीजवळ त्वरित साफसफाई करून उघडय़ा विहिरीला झाकण बसवण्यची मागणी होत आहे.आरोग्य विभागाकडून पाहणी गावात ज्या भागात डेंग्यू सदृश रुग्ण आढळले त्याठिकाणी तसेच ज्या भागात अस्वच्छता आहे त्या परिसरात स्वच्छतेसाठी आरोग्य विभागामार्फत गृहभेटी देऊन रुग्ण तपासणी केली जात आहे.