शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

सक्त मजुरीच्या शिक्षेमुळे वाळू तस्कर धास्तावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 11:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अवैध रेती वाहतूक व उपसा करणा:यांवर कारवाई केल्याचा राग येवून तिघांनी तहसीलदार व पथकातील ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अवैध रेती वाहतूक व उपसा करणा:यांवर कारवाई केल्याचा राग येवून तिघांनी तहसीलदार व पथकातील अधिकारी, कर्मचा:यांच्या अंगावर कार चालवून नेण्याचा प्रय} केल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने तिघांना सात वर्ष सश्रम कारावास व प्रत्येकी दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सुमन आसू गावीत, रमण आसू गावीत, रा.जामतलाव व धना रुबजी गावीत, रा.मोरथुवा, ता.नवापूर असे शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबतची संक्षीप्त हकीकत अशी : 28 जानेवारी 2013 मध्ये नवापूरचे तत्कालीन तहसीलदार संदीप भोसले हे नंदुरबारमधील बैठक आटोपून सायंकाळी साडेसहा वाजता नवापूरकडे जात होते. त्यांच्यासोबत पालिकेचे कर्मचारी राजेंद्र गवते, अनिल सोनार, पोलीस कर्मचारी निजाम पाडवी व चालक दिलीप चौरे होते. यावेळी त्यांना अवैध रेतीचे उत्खनन आणि वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी लागलीच मंडळ अधिकारी टी.आर.वसावे, दिलीप कुलकर्णी, विनायक गावीत, शिवाजी यादव, जयेश राऊळ, प्रकाश जामोदकर व ङोड.के.गायकवाड यांना करंजवेल येथे बोलविले. तेथे सरपणी नदीतून रेतीचा उपसा होत असल्याचे सांगितले. पथक व तहसीलदार तेथे गेल्यावर त्यांनी उपसा करणा:यांवर कारवाई करून तेथे असलेल्या ट्रकवरही (क्रमांक जीजे 16-यू 7416) कारवाई केली. त्यामुळे चालकाने तेथून पळ काढला. कारवाई केल्यानंतर तहसीलदार संदीप भोसले व पथक परत जात असतांना तीनटेंभा शिवारात  कारने त्यांचा रस्ता अडविला. कारमधून तीन जण उतरले त्यांनी तहसीलदार भोसले यांना ट्रकवर कारवाई केली तर महाग पडेल असे सांगून धमकी दिली. त्यानंतर ते सर्व गाडीत बसून जात असतांना रस्त्याच्या बाजुला उभ्या असलेल्या तहसीलदारांवर वाहन चालविण्याचा प्रयत्न केला. तहसीलदारांनी प्रसंगावधान राखून उडी मारल्याने ते बचावले. त्यानंतर पथक मार्गस्थ झाल्यानंतर पुन्हा थोडय़ा वेळाने     तीच कार पुन्हा येवून    तहसीलदाराच्या वाहनाला कट मारून निघून नेली. याबाबत तहसीलदारांनी नवापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून तिघांविरुद्ध शासकीय कामात अडथळा व ठार मारण्याचा प्रय} प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे दोषारोपपत्र जिल्हा सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. जिल्हा न्यायाधिश प्रमोद तरारे यांच्यासमोर या केसचे कामकाज चालले. न्यायालयाने सर्व बाबी पडताळून व साक्षी पुरावे तपासून आरोपी सुमन आसू गावीत, रमण आसू गावीत व धना रुबजी गावीत यांना ठार मारण्याच्या प्रय} प्रकरणी सात वर्ष सश्रम कारावास व प्रत्येकी दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली. या गुन्ह्याचे दोषारोपपत्र फौजदार रमेश वराडे यांनी दाखल केले होते. सरकार पक्षातर्फे अॅड.व्ही.सी.   चव्हाण यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून पोलीस नाईक गिरीश पाटील व नितीन साबळे होते.  या निकालाकडे नवापूर तालुक्याचे लक्ष लागून होते.