शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
4
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
5
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
6
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
7
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
8
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
9
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
10
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
11
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
12
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
13
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
14
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
15
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
16
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
17
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
18
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
19
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
20
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
Daily Top 2Weekly Top 5

७७ ग्रामपंचायत हद्दीत रोहयोची कामे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 13:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : तालुक्यातील ७७ ग्रामपंचायती अंतर्गत मजुरांना कामे उपलब्ध करून देण्यात आली असून या कामांवर पाच ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : तालुक्यातील ७७ ग्रामपंचायती अंतर्गत मजुरांना कामे उपलब्ध करून देण्यात आली असून या कामांवर पाच हजार ९२२ मजूर कामावर आहेत. नवागाव ग्रुपग्रामपंचायत अंतर्गत डोकारे येथील साठवण बंधाऱ्यातून गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ आमदार शिरीष नाईक यांच्या हस्ते करण्यात आला.या वेळी जि.प. सदस्य अजित नाईक, पं.स. सभापती रतिलाल कोकणी, पं.स. सदस्य दारासिंग गावीत, नवागावच्या सरपंच शर्मिला गावीत, प्रकाश नाईक, निलेश गावीत, प्रभूदास गावीत, भटेसिंग नाईक, महारु गावीत, दिलीप पवार, राम कोकणी, योगेश चौधरी, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, सहायक गटविकास अधिकारी बी.डी. गोसावी, विस्तार अधिकारी किरण गावीत, ग्रामविकास अधिकारी ई.डी. पाटील उपस्थित होते.तालुक्यात नवागाव, चिंचपाडा, खानापूर, खेकडा, निमदर्डा, चेडापाडा, बोकळझर, कडवान, वºहाडीपाडा, डाळीआंबा व चेडापाडा या गावात गाळ काढण्याची कामे सुरू आहेत. याशिवाय इतर ४१ ग्रामपंचायतींच्या हद्दीतील गाळ काढण्याच्या कामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. तालुक्यात एकूण ७७ ग्रामपंचायतीमध्ये कामे सुरू आहेत. त्यात आणखी ग्रामपंचायतींचा समावेश करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. प्रति दिन २३८ रुपये मजूरीच्या दराने व आठ दिवसाच्या आत थेट मजुरांच्या बँक खात्यात त्यांची रक्कम जमा होणार आहे. स्थानिक मजुरांना आपल्या गावातच रोजगार मिळत असल्याने ते समाधानी आहेत. गाळ काढल्याने जलसंधारण होऊन भूगर्भातील पाण्याची पातळी वाढीस मदत होणार आहे. घरकूल, शौचालय, शोषखड्डे, नाडेप, सीसीटी, सिंचन विहीरी व रोपवाटीका आदी ग्रामीण विकासाची कामे होत आहेत.लोक कामात व्यस्त राहतील त्यामुळे विनाकारण प्रवास करणार नाहीत अशी योजनेची आखणी करण्यात आली आहे. गावोगावी अशी कामे सुरू करण्यासाठी २५ नोडल अधिकाऱ्यांची ग्रामपंचायतनिहाय नेमणूक करण्यात आली आहे. सरपंच, ग्रामसेवक व रोजगार सेवकांशी समन्वय साधून कामे केली जात आहेत. तालुक्यात बाहेरुन आलेल्या सर्व मजुरांना त्यांच्या गावातच रोजगार देण्याचा प्रयत्न होत आहे. ज्याला रोजगार हवा त्यांनी तात्काळ रोजगार मागणी करावी. आठ हजारापेक्षा जास्त लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे तालुक्याचे उद्दिष्ट आहे. आज तालुक्यात पाच हजार ९२२ मजूर कामावर असून या संख्येत वाढ होईल, अशी माहिती गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी दिली.कोरोना महामारीमुळे नंदुरबार जिल्ह्यात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे बेरोजगार मजुरांना तात्काळ काम उपलब्ध करुन देणे आवश्यक होते. त्या अनुषंगाने पालकमंत्री अ‍ॅड.के.सी. पाडवी यांनी जिल्ह्यात एक लाख लोकांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्याचाच एक भाग म्हणून नवागाव ग्रुपग्रामपंचायत अंतर्गत डोकारे येथे १९४ मजुरांना व तालुक्यात एकूण पाच हजार ९२२ मजुरांना मनरेगा अंतर्गत रोजगार मिळाला आहे.-शिरीष नाईक, आमदार, नवापूर