शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
2
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
3
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
4
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
5
कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली
6
LIVE: नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या मुलाचा संताप, काय म्हणाला?
7
Raja Shivaji Box Office: रितेश देशमुख ठरला बॉक्स ऑफिसचा 'राजा'! ४ दिवसांत सिनेमाची किती कोटींची कमाई?
8
'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले 
9
अवघ्या एका मताने फैसला, या मतदारसंघात रंगली रोमांचक लढत, कुणी मारली बाजी?
10
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
11
राजकारणात 'ब्लॉकबस्टर' एन्ट्री घेणाऱ्या थलापती विजयनं आई वडिलांविरोधात खटला का दाखल केला होता?
12
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
13
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
14
Iran War: Iran War: अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर
15
नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…
16
वैभव सूर्यवंशी ते अक्षत रघुवंशी! IPL पदार्पणात पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकणारे ११ 'धुरंधर'
17
सलमान खान साकारणार 'सुपरहीरो'! राज आणि डीकेच्या आगामी चित्रपटात करीना कपूरची वर्णी?
18
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
19
Tarot Card: अंगारकीचा मुहूर्त आणि बाप्पाची कृपा; कोणाचे नशीब बदलणार? वाचा टॅरो भविष्य
20
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
Daily Top 2Weekly Top 5

संसाराचे बिºहाड घेऊन रिक्षा चालकांचा १४०० किलोमीटरचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 12:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क लहान शहादे : रिक्षा व्यवसायामुळे गुजरातमध्ये जेमतेम व्यवसायाची घडी बसत होती. पण त्यालाही कोरोनाची दृष्ट नजर ...

लोकमत न्यूज नेटवर्कलहान शहादे : रिक्षा व्यवसायामुळे गुजरातमध्ये जेमतेम व्यवसायाची घडी बसत होती. पण त्यालाही कोरोनाची दृष्ट नजर लागली असून आता रिक्षावरच आमच्या संसाराचे बिºहाड घेऊन आमच्या गावी बनारसला निघालो आहोत, ही प्रतिक्रिया आहे सुरतमधून १४०० किलोमीटर लांब आपल्या गावी रिक्षानेच परतीला निघालेल्या चंदीलाल याची.कोरोनामुळे परराज्यात उदरनिर्वाहासाठी गेलेल्या कुटुंबांचे खूपच हाल होत आहेत. या कुटुंबांना आता आपल्या गावाची ओढ लागली असून कसे का असेना गावी पोहोचावे या भावनेतून रोज हजारो कुटुंब रस्त्यावर दिसत आहेत. असेच सायन (सुरत) मधून रिक्षावरच आपला संसार घेऊन गावी निघालेल्या कुटुंबांचे हाल खूपच वाईट आहेत. नंदुरबार-प्रकाशा रस्त्यावरुन सलग एका रांगेत रिक्षा जात होत्या. हे कुटुंब दुपारच्यावेळी सावलीत एका झाडाखाली विसावले होते. या वेळी त्यांची भेट घेतली असता त्यांनी सांगितले की, आम्ही मूळ बनारसचे (उत्तर प्रदेश) आहोत. १५ वर्षापूर्वी रोजगारासाठी सुरतेला आलो. तेथेच रिक्षा व्यवसाय करू लागलो. त्याठिकाणी आम्ही सर्वजण एकाच इमारतीत राहत होतो. आता कोरोनामुळे परिस्थिती गंभीर झाली. रोजगारही बुडाला. घरमालकाला देण्यासाठी भाडे नव्हते. त्यामुळे घरमालकाने दोन महिन्याऐवजी किमान एका महिन्याचे तरी भाडे द्या आणि घर खाली करा, असा तगादा लावला. त्यामुळे आम्ही सर्वांनी आपल्या गावी परत जाण्याचा निर्णय घेतला. रिक्षातच सर्व सामान घेऊन आम्ही गावाकडे निघालो आहोत.