शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
3
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
4
"मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
5
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
6
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
7
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
8
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
9
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
10
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
11
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
12
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
13
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
14
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
15
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
16
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
17
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
18
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
19
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
20
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद

शहादा व तळोदा तालुक्यात पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2020 12:51 PM

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा/तळोदा : शहादा व तळोदा तालुक्यात बुधवारी पावसाने हजेरी लावली. परतीच्या या पावसाने पिकांचे नुकसान झाले ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा/तळोदा : शहादा व तळोदा तालुक्यात बुधवारी पावसाने हजेरी लावली. परतीच्या या पावसाने पिकांचे नुकसान झाले आहेे. तळोदा शहरात दुपारी तर शहादा तालुक्यात सायंकाळी पावसाने हजेरी लावली. तळोदातळोदा शहरात बुधवारी दुपारी अचानक पावसाला सुरूवात झाली. पावसामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतकऱ्यांचे धान्य ओले झाले होते. त्यामुळे व्यापारी व शेतकरी यांची तारांबळ उडाली होती.  शहर व तालुक्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. यातू दुपारी तीन वाजेचा सुमारास अचानक पावसाला सुरुवात झाली. दहा मिनिटे पर्यंत पाऊस चालला होता. गेल्या सहा महिन्यापासून बंद असलेले मार्केट सोमवारपासून सुरू झाले आहे. यामुळे शेतकरी बाजारात माल घेऊन आले होते. याच दरम्यान पाऊस आल्याने धान्याला फटका बसला. पाण्यात धान्य खराब झाल्याने शेतकर्यांना अडचणी आल्या.शहादाशहादा तालुक्यातील बुपकरी, लांबोळा, डामरखेडा यासह विविध भागात सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे डामरखेडा परीसरातील महामार्गावर पाणी वाहने अडकून पडली होती.  पावसामुळे शेतशिवाराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान तालुक्यात २४  ऑक्टोबरपर्यंत परतीच्या पावसाची हजेरी लागणार असल्याचा अंदाज आहे. यातून मंगळवारपासून शहादा शहर व तालुक्यात ढगाळ वातावरणासह वीजांचा कडकडाट सुरू होता. रात्री उशिरा अनेक भागात रिमझिम पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान बुधवार दुपारपासून म्हसावद, औरंगपूर, राणीपूर, भादा, पाडळदा, पिंगाणे यासह विविध भागात पाऊस सुरू होता. पावसामुळे प्रकाशा ते शहादा दरम्यान चिखल होवून वाहने अडकून पडली होती.  चिखलामुळे सात ते आठ दुचाकींचे अपघात झाल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान पावसामुळे खळवाड्या तसेच घरांवर टाकलेले धान्य पावसात सापडून खराब झाले. शेतशिवारातही पावसामुळे नुकसान झाले आहे. 

वाहतूक विस्कळीत शहादा तालुक्यात दोन दिवसांपासून पाऊस सुरू असल्याची माहिती शेतकरी देत आहेत. यामुळे महसूल व कृषी विभागाने पंचनामा करुन शेतकर्यांना भरपाई मिळवून देण्यास मदत करण्याची मागणी करण्यात आली आहे. पावसामुळे तालुक्यातून जाणार्या विसरवाडी ते सेंधवा या राष्ट्रीय महामार्गाचे काम पुन्हा ऐरणीवर आले आहे. अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याने काही तासांसाठी वाहतूक ठप्प झाल्याचे बुधवारी दिसून येत होते. शेतकर्यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले.