शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
4
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
5
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
6
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
7
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
8
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
9
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
10
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
11
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
12
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
13
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
14
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
15
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
16
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
17
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
18
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
19
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
20
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
Daily Top 2Weekly Top 5

वीज बिल थकल्याने पालिकेच्या कूपनलिकांचा वीज पुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:56 IST

तळोदा पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे एकूण ४४ लाख ३६ हजार इतकी थकबाकी आहे. याबाबत २१ जानेवारी रोजी बिल भरण्याची ...

तळोदा पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे एकूण ४४ लाख ३६ हजार इतकी थकबाकी आहे. याबाबत २१ जानेवारी रोजी बिल भरण्याची अखेरची तारीख होती; मात्र पालिकेने वीज बिल भरले नव्हते. याबाबत विद्युत वितरण विभागाकडून पालिकेला एकदा स्मरण पत्रदेखील देण्यात आले होते, तरी ही बाब पालिकेने गांभीर्याने न घेत थकबाकी भरली नाही, त्यामुळे शहरातील ठाणेदार गल्ली, मराठा चौक, शनी गल्ली, विद्यानगरी, मोठा माडीवाडा, दत्त कॉलनी, काकशेठ गल्ली, खान्देशी गल्ली, गणपती गल्ली, शहराला पाणी पुरवठा करणारे मुख्य स्रोत, दत्त कॉलनी, भोई गल्ली, कुंभार गल्ली, मल्लकवाडा, रामगड यांसह एकूण २२ ठिकाणचा पाणी पुरवठा करणाऱ्या कुपनलिकांचा वीज पुरवठा शुक्रवारी खंडित केला.

नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडे महावितरणची विजेची ४४ लाखांची रक्कम थकीत आहे. हे थकीत बिल वेळेत न भरल्याने अखेर महावितरणने वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई केली. अचानक सकाळपासून वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासून हाल झाले. अनेकांनी शुक्रवारी दिवसभर पाण्याच्या ड्रमवर तहान भागवली. नगरपालिकेकडे गेल्या अनेक दिवसांपासून ही थकबाकी आहे. थोडी थोडी रक्कम वीज बिलापोटी भरली जात असे; परंतु ही थकबाकी वाढत जाऊन ती ४२ लाखांपर्यंत पोहोचल्यामुळे वीज पुरवठा खंडित केल्याचे महावितरणचे उपकार्यकारी अभियंता चहांदे यांनी सांगितले. तळोदा पालिकेचे उत्पन्न कमी असून, नागरिकांकडे पाणीपट्टी, घरपट्टी व इतर कर बाकी असून, पालिका वसुली करण्यात कमी पडल्याचे बोलले जाते; मात्र आर्थिक नियोजन करण्यात पालिका कमी पडल्यानेच आज ही नामुष्की पालिकेवर ओढवल्याची चर्चा दिवसभर शहरात होती.

ग्रामीण भागातही कारवाई

ग्रामीण कक्षात पाणी पुरवठा विभागाकडे अंदाजित ८८ लाख एवढे एकूण थकीत बिल भरणा आहे. याबाबत वेळोवेळी संबंधिताना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तरीही बिले न भरल्याने शुक्रवारी दिवसभरात ग्रामीण भागातील आमलाड, बेलीपाडा, गणेश बुधावल, भवर, राजविहीर, सरदारनगर, रेवानगर, झिरी, पाथडी, भाबलपूर, वाल्हेरी, सिंगपूर, शिर्वे अशा एकूण २० ठिकाणचा पाणी पुरवठ्याचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. तर बोरद गटात १७ कुपनलिकांची जोडणी असून, अंदाजित ७० लाख एवढे थकीत आहेत. त्यापैकी शुक्रवारी दिवसभरात अलवान, मोहिदा, खर्डी, बंधारा, मोठा धनपूर अशा पाच ठिकाणचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.

पाच ठिकाणच्या कूपनलिकांचा वीज भरणा एकूण रक्कम आठ लाख ४१ हजार एवढा भरणा केला जाणार आहे. त्या अनुषंगाने या पाचही ठिकाणचा वीज पुरवठा सुरळीत केला जाणार आहे. उर्वरित थकीत रक्कमही लवकरच भरणा केली जाणार आहे. नागरिकांनी पाणीपट्टी भरून सहकार्य करावे.

-सपना वसावा, मुख्याधिकारी, नगरपालिका, तळोदा

नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडे ४४ लाख एवढी रक्कम थकीत आहे. याबाबत संबंधित प्रशासनास लेखी नोटीस बजावूनही वीज बिलाचा भरणा न झाल्यामुळे वीज पुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेतला. बिले भरल्याशिवाय वीज पुरवठा सुरू करता येणार नाही.

-पी.वाय. चहांदे, उपकार्यकारी अभियंता, वीज कंपनी, तळोदा.

एकूण पाणी पुरवठा थकीत रक्कम

अर्बन ४४ लाख ३६ हजार

बोरद गटात ७० लाख

ग्रामीण कक्ष ८८ लाख

शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य कूपनलिका दोन लाख आठ हजार

गुरांच्या दवाखान्याजवळील परिसर असलेली कूपनलिका एक लाख ७८ हजार

उपजिल्हा रुग्णालय परिसरातील एक लाख ४७ हजार

विद्यानगरी परिसर एक लाख ४८ हजार

शनि गल्ली परिसरात एक लाख ५८ हजार

असा एकूण आठ लाख ४१ रुपयांचा भरणा शुक्रवारी सायंकाळी सात वाजता पालिकेने केला आहे.