शहरं
Join us  
Trending Stories
1
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
2
Election Results 2026 LIVE: "बंगालच्या विकासासाठी भाजप आता कोणतीही कसर सोडणार नाही"; ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींची प्रतिक्रिया
3
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
4
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
5
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
6
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
7
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
8
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
9
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
10
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
11
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
12
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
13
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
14
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
15
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
16
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
17
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
18
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
19
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
20
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
Daily Top 2Weekly Top 5

छायाचित्रणाचा व्यवसाय पडला ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 11:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी झालेल्या लॉकडाऊनमुळे नंदुरबार शहरासह जिल्ह्यातील सुमारे एक हजार छायाचित्रकार आर्थिक अडचणीत ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी झालेल्या लॉकडाऊनमुळे नंदुरबार शहरासह जिल्ह्यातील सुमारे एक हजार छायाचित्रकार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. हातावर पोट असल्याप्रमाणे छायाचित्रकारांना देखील चिंता सतावत आहे.मार्च ते जून महिन्या दरम्यान मोठ्या प्रमाणावर लग्न सोहळे आणि सार्वजनिक व घरगुती समारंभांचा हंगाम असतो. मात्र यंदा कोरोना मुळे या हंगामा वरील संकट अधिक गडद झाले आहे. छायाचित्रणा बरोबरच एडिटर, ग्राफिक डिझाईनर, फोटो एडिटर, एक्सपोजिंग त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. नंदुरबार शहर तथा जिल्ह्यात सुमारे एक हजारावर व्यावसायिक छायाचित्रकार आहेत. यात अनेक व्यवसायिकांनी लाखो रुपये गुंतवणूक करून कॅमेरे, संगणक, ड्रोन आणि स्टुडिओ उभारले आहेत. याशिवाय यातून अनेकांना रोजगार मिळत होता.शहरी भागासह ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणावर हौशी छायाचित्रकार आहेत. किंबहुना फोटोग्राफी हेच त्यांच्या कुटुंबाचे उदरनिवार्हाचे साधन बनले आहे.नंदुरबारसह शहादा, तळोदा, धडगाव, अक्कलकुवा, मोलगी आणि नवापूर येथील सर्वच छायाचित्रकारांचे कामकाज सध्या बंद पडले आहे. दरवर्षी मार्च ते जून दरम्यान मोठ्या प्रमाणावर लग्नसमारंभाच्या आॅर्डर नोंदणी असल्याने सर्व छायाचित्रकारांनी नियोजन केले होते. परंतु कोरोना पार्श्वभूमीवर विवाह सोहळे रद्दचा फतवा शासनाने काढला. त्यापाठोपाठ देशभर जारी झालेल्या लॉकडाऊन नंतर संकटात आणखीनच भर पडली. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील छायाचित्रकारांची आर्थिक कोंडी झाली.यंदाचा हंगाम गेला तरी छायाचित्रणासाठी दिवाळीनंतर येणाऱ्या लग्नसराई हंगामापर्यंत अडचणींचा सामना करावा लागणार आहे.आधीच मोबाईलमुळे बसलाय फटका...सोशल मीडिया आणि मोबाईलच्या जमान्यात फोटोग्राफी हरवत चालली आहे. यामुळे महागडी गुंतवणूक करून देखील फोटो स्टुडिओ चालविणे कठीण झाले आहे. संचारबंदी असल्यामुळे दुकाने देखील बंद असून साखरपुडा, लग्न, वाढदिवस, ग्रहशांती यासारखे कार्यक्रम पुढे ढकलल्याने नोंदणी झालेल्या आॅर्डर रद्द होऊ लागल्या आहेत. इतरांप्रमाणे राज्य शासनाने व्यवसायिक छायाचित्रकारांना मदतीचा हात देण्याची मागणी नंदुरबार जिल्हा व्यावसायिक फोटोग्राफर संघटना आणि नंदुरबार जिल्हा वृत्तपत्र छायाचित्रकार संघटना यांनी केली आहे.