शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
2
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
3
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
4
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
5
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
6
मध्यमवर्ग त्याग करायला तयार आहेच, पण डझनभर गाड्यांचा ताफा...; जयंत पाटील यांची टिप्पणी
7
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
8
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
9
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
10
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
11
"सौंदर्यासाठी नाही, तर मी पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलं"; नवरा झाला हैवान, बायकोचा घेतला जीव
12
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
13
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
14
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
15
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
16
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
17
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
18
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
19
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
20
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

शहादा, तळोदा व नवापुरातही लवकरच आॅक्सीजन बेडची सुविधा करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 12:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : भविष्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेता शहादा, तळोदा, एकलव्य कोविड केअर सेंटर आणि ...


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : भविष्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेता शहादा, तळोदा, एकलव्य कोविड केअर सेंटर आणि नवापूर येथे आॅक्सिजन बेड्सची व्यवस्था करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड-१९ बाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, अविशांत पंडा, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रघुनाथ भोये, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके उपस्थित होते. डॉ.भारुड म्हणाले आॅक्सिजन बेड्ससोबत आवश्यक मनुष्यबळ, एक्सरे यंत्र, तंत्रज्ञ यांचेदेखील नियोजन करावे.
जिल्ह्यातील खाजगी व शासकीय रुग्णालयात आॅक्सिजन सिलींडरच्या मागणीचा आढावा घ्यावा व आवश्यकतेच्या तीनपट पुरवठा होईल याबाबत नियोजन करावे. कोविड हॉस्पिटलसाठी अतिरिक्त एसबीबीएस डॉक्टर्सना प्रशिक्षित करावे.
अक्कलकुवा येथे स्वॅब एकत्रित करण्यासाठी फिरते पथक नेमावे व नवापूर येथे आणखी एक पथक वाढवावे. संपर्क साखळीतील व्यक्तिंचा शोध घेवून त्यांची तपासणी वेळेवर करावी. खाजगी कोविड रुग्णालयाची व्यवस्था शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार होत असल्याबाबत योग्य संनियत्रण करावे. लस विकसित होईपर्यंत कोरोना बाधितांवर उपचार करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात मुलभूत सुविधा विकसीत कराव्यात, असे त्यांनी सांगितले.
स्वॅब तपासणीचे प्रमाण वाढविण्याचा प्रयत्न करावा. मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये जनजागृतीसाठी ध्वनीक्षेपक असलेल्या वाहनाची व्यवस्था करावी. मास्क न घालता बाहेर फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी आणि याबाबतच्या आदेशाचे कटाक्षाने पालन करावे, असेही डॉ.भारुड म्हणाले. पाटील यांनी फॅसिलीटी अ‍ॅपच्या नोंदी अद्ययावत करण्याबाबत मार्गदर्शन केले. बैठकीस तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.