शहरं
Join us  
Trending Stories
1
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
2
Top Marathi News Live: शरद पवारांची भेट घेतल्याने राजकारणात चर्चांचे वादळ; सुनील तटकरेंनी मांडली भूमिका
3
होर्मुझ'मधून गॅस पुरवठा ठप्प, भारताचा 'प्लॅन बी' तयार! पाहा कशी केली जाते भरपाई
4
IPL 2026: "पहिल्या चेंडूपासूनच..." RCB विरुद्धच्या सामन्याआधी शेन वॉटसनचा KKR च्या खेळाडूंना कानमंत्र!
5
NEET Exam Paper Leak : NEET पेपर लीकमध्ये मोठा खुलासा! २ भावांनी डॉक्टरकडून ३० लाखांत खरेदी केला पेपर अन्...
6
मुलावर एकाधिकार दाखवण्याच्या आईच्या वृत्तीवर उच्च न्यायालयाची चिंता; वडिलांना मुलाला भेटण्याचा अधिकार ठेवला कायम 
7
Prateek Yadav : शाळेत मैत्री, ई-मेलवर प्रेम अन् १० वर्षांचा रोमान्स! अशी होती प्रतीक आणि अपर्णा यादव यांची लव्ह स्टोरी
8
४ दिवसांत ६०० रुपयांपेक्षा अधिकनं आपटला 'टाटा'चा हा शेअर; रेखा झुनझुनवालांचे २८०० कोटी बुडाले
9
‘हातावर चुंबन घेणे ही...’; टॅक्सीचालकाला न्यायालयाने सुनावली दोन वर्षे कारावासाची शिक्षा
10
Central Railway: आसनक्षमता ७२, प्रवाशांची संख्या ४००; ‘टीसी’वर ताण; टार्गेट आणि वाढत्या हल्ल्यांमुळे रेल्वे कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात
11
Sonia Gandhi: काँग्रेस नेत्या सोनिया गांधी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल, नेमकं कारण काय?
12
अधिक मास २०२६: संकल्पपूर्तीसाठी अधिक मासात गुरुचरित्राचे 'हे' निवडक अध्याय वाचणेदेखील ठरेल प्रभावी!
13
सिद्धार्थ जाधवच्या पत्नीला पाहिलंत का? बिजनेसवुमन आहे तृप्ती, करते 'हे' काम
14
Prateek Yadav : "कौटुंबिक वादानंतर डिप्रेशन…"; १३ वर्षे सोबत असलेल्या प्रतीक यादव यांच्या मित्राचा गौप्यस्फोट
15
राजकारणापासून दूर..; प्रतीक यादव काय काम करायचे? किती होती त्यांची संपत्ती? जाणून घ्या...
16
किती लाजिरवाणं आहे! 'कान्स'च्या रेड कार्पेटवर आलिया भटकडे फोटोग्राफर्सचं दुर्लक्ष? व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांचा चीनला मोठा इशारा! जिनपिंगना भेटण्यापूर्वीच इराणबाबत ठणकावून सांगितलं; काय म्हणाले?
18
Pune Nasrapur Case : सीसीटीव्ही, ‘शेव’ आणि टणक वस्तू...; नसरापूर प्रकरणात आणखी कोण सामील ?
19
ट्रम्प यांची टीका फोल! इराणची तटबंदी अधिक मजबूत; ३० क्षेपणास्त्र तळ अजूनही 'ॲक्टिव्ह'
20
ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे पद धोक्यात; गंभीर आरोप करत ८० मंत्र्यांनी फडकावले बंडाचे निशाण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा रुग्णालयात इतर शस्त्रक्रियांनी घेतला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2020 12:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनामुळे जिल्हा रुग्णालयात बंद झालेल्या इतर रोगांच्या शस्त्रक्रिया तसेच दैनंदिन तपासणीला पुन्हा सुरूवात झाली ...

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनामुळे जिल्हा रुग्णालयात बंद झालेल्या इतर रोगांच्या शस्त्रक्रिया तसेच दैनंदिन तपासणीला पुन्हा सुरूवात झाली आहे. यातून गेल्या महिन्यात ४०० मातांची प्रसूती झाल्याची माहिती देण्यात आली आहे.    
 मार्च महिन्यात सुरू झालेले लाॅकडाऊन त्यानंतर एप्रिल महिन्यात जिल्ह्यात आढळून आलेला पहिला रुग्ण यातून जिल्हा रुग्णालयातील इतर  लहान मोठ्या शस्त्रक्रिया तसेच दैनंदिन तपासणी करण्याचे काम थांबवण्यात आले होते. तीन महिने हे कामकाज ठप्प झाले होते. परंतू जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण कमी होत असल्याचे दिसून आल्यानंतर इतर कामकाजाला गेल्या दीड महिन्यात गती देण्यात आली आहे. यातून अस्थीरोग, प्रसूती तसेच इतर शस्त्रक्रिया सुरू करण्यात आल्या आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयातील विविध कक्षांमध्ये दाखल रुग्णांची संख्यादेखील वाढली असून प्रत्येकाला वेळीच उपचार देत रवाना करण्यावर भर देण्यात येत आहे. तूर्तास गर्भवती माता आणि अपघात झालेल्या रुग्णांची प्रथम प्राधान्याने काळजी घेण्यात येत आहे. तसेच रुग्णालयात  दीर्घकाळापासून उपचार घेणार्या रुग्णांची विशेष व्यवस्था करुन त्यांना उपचार दिले जात असल्याची माहिती देण्यात आली आहे. 

सप्टेंबरमध्ये सर्वाधिक मातांची प्रसूती 
जिल्हा रुग्णालयात गेल्या सप्टेंबर महिन्यात ४४३ मातांची प्रसूती करण्यात आली आहे. यात १५५ मातांची सीझर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. या सर्व माता सुखरूप असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान नवापूर, तळोदा उपजिल्हा व अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात मातांच्या प्रसूतीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत २०० च्या जवळपास मातांची प्रसूती झाल्याची माहिती देण्यात आली आहे. रुग्णालयात ओपीडी सुरु झाली असल्याने दैनंदिन २०० पेक्षा अधिक नागरीकांच्या तपासण्या करुन संदर्भ सेवा देण्यात येत आहे. रुग्णालयाचे कामकाज पूर्वपदावर येवू लागल्याने दाखल रुग्ण संख्याही वाढली आहे. तूर्तास २३० जण रुग्णालयात विविध उपचारांसाठी इलाज घेत असून ३६ जण कोरोना कक्षात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. 

६४ माेठ्या शस्त्रक्रिया 
गर्भवती मातांच्या प्रसूतीसोबत हर्नियासह इतर लहान मोठ्या आजारांवरच्या शस्त्रक्रियाही जिल्हा रुग्णालयात करण्यात येत आहेत. यात प्रामुख्याने सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात ३० लहान शस्त्रक्रिया, ६४ मोठ्या, ५ अस्थीरोग आणि एक इतर मोठी शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. यातील सर्व रुग्ण हे सुखरूप असल्याची माहिती देण्यात आली आहे. रुग्णालयात येत्या काळात नेत्रतपासणी शिबीरे आणि माेतीबिंदू शस्त्रक्रियाही सुरू होतील अशी शक्यता आहे. कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्याने वैद्यकीय अधिकारी, पारिचारिका, परीचर यांचे ड्यूटीचे तास नियमित होत असल्याने त्यांनाही दिलासा मिळाल्याने शस्त्रक्रिया ह्या नियमितपणे पार पडत असल्याचे सांगण्यात आले आहे. 

कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याने लहान मोठ्या शस्त्रक्रियांना वेग आला आहे. दर दिवशी ठरविक वेळेत शस्त्रक्रिया पूर्ण केल्या जात आहेत. अपघाती रुग्णांवर तातडीने उपचार करुन गरज भासल्यास गंभीर शस्त्रक्रियाही पार पाडत आहोत. 
-डाॅ. के.डी.सातपुते, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, नंदुरबार.