शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
6
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
7
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
11
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
12
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
13
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
14
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
15
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
16
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
17
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
18
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
19
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
20
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
Daily Top 2Weekly Top 5

समाज माध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित केल्यास गुन्हे दाखल होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 12:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जगभरासह देशात कोरोना प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे़ यातून देश आणि राज्यात लॉकडाऊन करण्यात आले ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जगभरासह देशात कोरोना प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे़ यातून देश आणि राज्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे़ याचा फायदा घेत काहींकडून चुकीच्या पोस्ट सोशल मिडियातून फॉरवर्ड करुन गैरसमज पसरवणे तसेच धार्मिक तेढ निर्माण केली जात आहे़ या पार्श्वभूमीवर पोलीस दल सतर्क झाले असून सोशल मिडीयावर नजर ठेवत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार आहेत़पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी कोरोनाच्या आडून दोन धर्मात तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाईचे संकेत दिले असून त्यानुसार सायबर सेल सोशल मिडियावर लक्ष ठेवणार आहे़ लॉक डाऊन काळात विशिष्ट धर्माबद्दल जुने व्हिडिओ पोस्ट करणे, मेसेज, आॅडिओ क्लिप, प्रसारित करुन अफवा पसरवणे तसेच कोरोनाबद्दलचे जुने व्हिडिओ पोस्ट करुन नागरिकांत भिती निर्माण करण्याचे प्रकार सुरु आहेत़ यात गेल्या आठ दिवसात दोन पोलीस ठाण्यांमध्ये कायदेशीर कारवाई करुन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ यातूनही हे प्रकार बंद होत नसल्याने समाज माध्यमात प्रचलित असलेल्या त्या त्या व्हॉटसअप ग्रुपने १५ एप्रिलपर्यंत फक्त ग्रुप अ‍ॅडमिनने मेसेज करण्याची सेटींग करुन कामकाज करण्याचे कळवले आहे़पोलीस दलाच्या सायबर सेलकडून सर्वच प्रकारच्या सोशल मिडियावर लक्ष ठेवले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़ यातून नियंमांचे उल्लंघन झाल्याने फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़ पोलीस दलाकडून सर्व पोलीस ठाण्यांना याबाबत सूचना करण्यात आल्या असून दर दिवशी सोशल मिडियात प्रसारित होणाºया सर्व पोस्टचा आढावाही घेतला जाणार आहे़दरम्यान या पार्श्वभूमीवर पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी शनिवारी रात्री जिल्ह्यातील मौलवींची बैठक घेत त्यांना विविध सूचना केल्या होत्या़ यावेळी त्यांनी कोरोना दूर ठेवण्यासाठी सामूहिक नमाज पठण आणि इतर सार्वजनिक कार्यक्रम टाळण्याच्या सूचना केल्या आहेत़ त्यांच्या सर्व सूचना मौलवींकडून मान्य करण्यात आल्या असून त्यानुसार नमाज पठण हे घरोघरी करण्याचे सूचित केले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे़