शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
2
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
3
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
4
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
6
aumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
7
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
8
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
9
"आमिर खानच्या प्रोडक्शनमधून ऑडिशनसाठी फोन आला आणि...", नम्रता संभेरावने सांगितला 'तो' किस्सा
10
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
11
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
12
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
13
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
14
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
15
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
16
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
17
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
18
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
19
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
20
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’

पाणी परवानगीसाठी शेतकऱ्यांची अडवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 12:46 PM

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : प्रकाशा व सारंगखेडा बॅरेज पाण्याने तुडुंब भरले आहे. उपसा सिंचन योजना जरी प्रस्तावित असल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : प्रकाशा व सारंगखेडा बॅरेज पाण्याने तुडुंब भरले आहे. उपसा सिंचन योजना जरी प्रस्तावित असल्या तरी ज्या शेतकऱ्यांनी वैयक्तिक दीर्घकालीन व हंगामी पाणी परवानगी घेतलेली आहे. त्यांना पुन्हा नियमित करतेवेळी प्रकाशा बॅरेज प्रशासनाकडन पाणीपट्टी भरण्याची सक्ती केली जात आहे. एकीकडे कोरोना तर दुसरीकडे अतिपावसामुळे शेतकरी अडचणीत असताना अशी अडवणूक का? असा सवाल संतप्त शेतकरी करीत आहे.सविस्तर वृत्त असे की, प्रकाशा व सारंगखेडा बॅरेज दोन्ही आजच्या स्थितीला पाण्याने तुडुंब भरले आहेत. प्रकाशा बॅरेज अंतर्गत ३७ गावे येतात तर सारंगखेडा बॅरेज अंतर्गत ५६ गावे येतात. प्रकाशा बॅरेज अंतर्गत ७७१ शेतकऱ्यांनी दीर्घकालीन पाणी परवानगी घेतली आहे तर ६८ शेतकºयांनी हंगामी पाणी परवानगी घेतली आहे. सारंगखेडा बॅरेज अंतर्गत ३७५ शेतकºयांनी दीर्घकालीन तर ७९ शेतकºयांनी हंगामी पाणी परवानगी घेतली आहे. पूर्वी दीर्घकालीन (१८ वर्षासाठी) पाणी परवानगी देत होते. आता मात्र हंगामी पाणी परवानगी दिली जात असून दुसºया वर्षासाठी ती नियमित करावी लागते. मात्र त्यासाठी प्रकाशा बॅरेज प्रशासनाकडून अगोदरची थकबाकी भरल्याशिवाय परवानगी नियमित होणार नसल्याचे सांगण्यात येत आहे, असे शेतकºयांचे म्हणणे आहे. एकीकडे कोरोनाचा कहर सुरू आहे. त्यामुळे सर्वजण हतबल असताना शेतकरी कसेतरी शेतात पेरणी करून उत्पादन काढण्यामागे आहे. त्यातच यंदा पाऊसदेखील कमी-अधिक होत असल्याने हाती आलेले पीकही वाया जात आहे. मूग, उडीद हे तर वाया गेले आहे. आता सोयाबीनचीही तीच परिस्थिती झाली आहे. दुसरीकडे बॅरेजकडून अगोदर पाणीपट्टी भरण्याचा आग्रह केला जात आहे. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष देऊन पाणीपट्टीसाठी सक्ती करू नये, अशी मागणी शेतकºयांकडून केली जात आहे.ााणी परवानगी देत असताना थकबाकीऐवजी शेतकºयांची परिस्थिती समजून घेतली पाहिजे. आधीच कोरोनामुळे हतबल असताना शेतकºयांचे मनोबल वाढविणे गरजेचे आहे. यासाठी प्रकाशा बॅरेज प्रशासनाने शेतकºयांच्या हिताचा विचार करावा.-संजय पाटील, शेतकरी.