शहरं
Join us  
Trending Stories
1
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
2
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
3
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
4
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा 'झालमुरी स्टॉल', पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
5
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
6
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
7
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
8
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
9
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
10
भारताच्या माजी क्रिकेटपटूची राजकीय मैदानात दमदार एंट्री, बड्या नेत्याविरोधात घेतली मोठी आघाडी
11
'या' स्टॉकनं केलं मालामाल! ५ वर्षांत १४००% चं छप्परफाड रिटर्न, आज पुन्हा अपर सर्किट
12
वैशाख अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: राहु काळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, चंद्रोदयाची वेळ!
13
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
14
UPSC टॉपर घडवणाऱ्या शिक्षिकेचे विद्यार्थ्याकडून अपहण; १.९० कोटी लुटून हॉस्पिटलमध्ये लपला, कारण समोर
15
'सैराट'फेम अरबाज शेखने केला निकाह, कोण आहे 'सल्या'ची पत्नी? रिंकू राजगुरुनेही केली कमेंट
16
"'ट्विंकल-ट्विंकल' शिकण्यासाठी २.५ लाख द्यायचे?"; सिनियर केजीची फी पाहून पालक शॉक
17
दोन सिलिंडर, एकदाच रांगेत राहून भरा, दुप्पट फिरा...! या कंपनीने सीएनजीमध्ये सात सीटर कार लाँच केली
18
बंगालमध्ये सायनी घोष यांचं गाणंच ठरलं गेमचेंजर; भाजपला थेट सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचवलं
19
'खुल्लम खुल्ला प्यार' आता बंद! 'गर्लफ्रेंड कल्चर' BCCIला अमान्य, 'हे' ४ भारतीय काय करणार?
20
नक्कल करायलाही अक्कल लागते! रोहितच्या स्टाईलमध्ये बाबरचं सेलिब्रेशन; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Daily Top 2Weekly Top 5

खेतियात लोकप्रतिनिधींकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 12:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क खेतिया : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी खेतिया येथे करण्यात आलेल्या उपाययोजनांची खासदार गजेंद्रसिंह पटेल यांनी पाहणी ...

लोकमत न्यूज नेटवर्कखेतिया : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी खेतिया येथे करण्यात आलेल्या उपाययोजनांची खासदार गजेंद्रसिंह पटेल यांनी पाहणी केली. त्यानंतर सामाजिक अंतर राखत पोलीस, महसूल, आरोग्य विभाग, व पालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले. या वेळी खासदार पटेल यांनी कोरोनाला रोखण्यासाठी खासदार निधीतून एक कोटी तर एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिला.लॉकडाऊन काळात खेतियात पूर्णत: शुकशुकाट असून मध्य प्रदेश-महाराष्ट्र सिमेवर खेतिया-खेडदिगर येथे कडक बंदोबस्त आहे. सीमा तपासणी नाक्यावर येणाºया-जाणाºया नागरिकांची माहिती घेऊन त्यांची आरोग्य तपासणी करून पाठविण्यात येत आहे. सिमेवर पोलीस, महसूल, नगरपालिका, ग्रामपंचायत, नगर सुरक्षा समिती कर्मचारी, पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे, प्रांताधिकारी सुमेंरसिंह मुजाल्दे, तहसीलदार राकेश सत्या, नायब तहसीलदार जगन्नाथ वास्कले हे सतत भेट देऊन नागरिकांना सूचना देत आहेत. आमदार चंद्रभागा किराडे यांनीही खेतिया प्राथमिक आरोग्य केंद्रात भेट दिली. उपलब्ध सोयींची पाहणी करून उपचारासाठी ज्या साहित्यांची कमतरता आहे त्यांची माहिती घेतली व ते साहित्य लवकरच उपलब्ध करून देऊ, असे सांगितले.मध्य प्रदेश-महाराष्ट्र सीमेवर खेतिया येथून महाराष्ट्र, गुजरात राज्यातून अनेक नागरिक घरी जाण्यासाठी कोणी पायी तर कोणी मिळेल त्या वाहनाने प्रवास करीत आहे. चेकपोस्टवर त्यांची माहिती घेऊन त्यांना मिळेल त्या वाहनाने बसवून रवाना करण्यात येत आहे. सोमवारी एक झारखंड येथील रहिवासी सूरत येथे कामाला होता. कंपनी बंद झाल्याने त्याने थेट सुरतहून घरी जाण्यासाठी सायकलीने प्रवास सुरु केला. खेतिया चेकपोस्टवर आल्यानंतर तिथे उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्याची संपूर्ण माहिती घेऊन त्याला पुढे रवाना केले.