शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबकारकरांनो... तुमचे पिण्याचे पाणी किती शुद्ध?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 12:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  पाणी पुरवठ्याबाबत नंदुरबारवासीयांना गेल्या १५ वर्षांपासून कुठलीही टंचाई निर्माण झाली नाही. शहरवासीयांना दर एकदिवसाआड ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  पाणी पुरवठ्याबाबत नंदुरबारवासीयांना गेल्या १५ वर्षांपासून कुठलीही टंचाई निर्माण झाली नाही. शहरवासीयांना दर एकदिवसाआड ४५ मिनिटे पाणीपुरवठा केला जातो. विरचक प्रकल्पाच्या पंपींग स्टेशनजवळ असलेल्या दोन जलशुद्धीकरण प्रकल्पातून पाणी शुद्ध करून ते शहरवासीयांना पुरविले जाते.                  नंदुरबारातील जवळपास दीड लाख लोकसंख्येला विरचक व आंबेबारा प्रकल्पातून पाणी पुरवठा केला जातो. विरचक प्रकल्पातून ज्या भागात पाणीपुरवठा होतो तो शुद्धीकरण प्रकल्पातून असतो तर आंबेबारा धरणातून अर्थात आष्टे पंपींग स्टेशनमधून येणारे पाणी हे जलकुंभातच आवश्यक तसे शुद्धीकरण केले जाते. शहरात झोन नुसार ज्या भागात पाणीपुरवठा केला जातो त्या भागातील पाणी नमुने दररोज घेऊन ते शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठिवले जातात. दर एक किंवा दोन दिवसाआड त्या नमुन्यांचा अहवाल पालिकेला प्राप्त होतो. यासाठी स्वतंत्र एका कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात आलेली आहे.              पालिकेने आता वाढीव पाणीपुरवठा योजना तयार केली आहे. त्याचा सर्व्हेदेखील करण्यात आला आहे. या योजनेला मान्यता मिळाल्यास शहरवासीयांना मिटरप्रमाणे दररोज पाणी पुरवठा होणार आहे. त्यादृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. दरम्यान, पालिकेने शहरवासीयांसह शासकीय कार्यालयांना देखील मिटरप्रमाणे पाणी पुरवठा केला आहे. शहरालगतच्या वसाहतींचीही तशी मागणी आहे. 

दररोज ८० ते ९० लाख लिटर पाणी पुरवठाशहरात १५ जलकुंभांमधून दररोज झोननुसार ८० ते ९० लाख लिटर पाणी पुरवठा केला जातो. सर्व भागात पुरेशा दाबाने पाणीपुरवठा व्हावा यासाठी ठिकठिकाणी व्हॅाल्व तयार करण्यात आले आहेत. जवळपास १५ हजारापेक्षा अधीक नळजोडणीधारक आहेत. याशिवाय शासकीय   कार्यालये, शासकीय रुग्णालये     यांना देखील पाणीपुरवठा केला जातो. सर्व भागात शुद्ध पाणी पुरवठा केला जात असल्याचा पालिकेचा दावा   आहे. 

अशी हाेते तपासणी                 नंदुरबारात दर एक दिवसाआड त्या त्या भागात पाणी पुरवठा केला जातो. अर्थात दररोज निम्मे शहरात पाणी पुरवठा होतो. ज्या भागात पाणी पुरवठा होतो त्या झोनमधील पाणी नमुने घेतले जातात. ते जिल्हा रुग्णालयाच्या लॅबमध्ये चेकींगसाठी पाठविले जातात.                  झराळी येथे असलेल्या दोन्ही पाणी शुद्धीकरण प्रकल्पातील पाण्याची गुणवत्ता तेथे असलेल्या लॅबमध्ये दररोज तपासली जाते. त्यानंतरच पाणी पुरवठा केला जातो. 

१,४५,००० शहराची लोकसंख्या                                                                                                                                                                १४०(लिटर)  प्रती माणसी दररोज दिले जाते पाणी                                                                                                                             १५ टाक्या  पाणी वितरण करण्यासाठी                                                                                                                                                  २ जलशुद्धीकरण केंद्र 

शहरवासीयांना शुद्ध पाणी पुरवठा व्हावा यासाठी पालिका कटीबद्ध आहे. यासाठी दोन जलशुद्धीकरण केंद्र कार्यान्वीत आहेत. तेथे दररोज पाण्याची गुणवत्ता तपासणी केली जाते. शिवाय शासकीय लॅब मध्ये देखील पाणी नमुने तपासणीसाठी पाठविले जातात. दररोज नियमित पाणीपुरवठा होतो. -कैलास पाटील, पाणीपुरवठा सभापती, नंंदुरबार नगरपालिका.