शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

माझे कुटूंब माझी जबाबदारी मोहिम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 12:24 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोना जनजागृती आणि आरोग्य सर्वेक्षणासाठी शासनाने माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिम हाती घेतली आहे़ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोना जनजागृती आणि आरोग्य सर्वेक्षणासाठी शासनाने माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिम हाती घेतली आहे़ यांतर्गत रविवारी आरोग्य सर्वेक्षण सुरू करण्यात आले़ जिल्ह्यात ठिकठिकाणी आरोग्य कर्मचाऱ्यांनी घरोघरी जात नागरिकांच्या आरोग्याची माहिती घेण्यास सुरूवात केली़शहादा येथे आमदार राजेश पाडवी यांच्या उपस्थितीत सर्वेक्षण साहित्य वाटप करून शुभारंभ करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, पंचायत समिती सभापती बायजाबाई भिल, सातपुडा कारखान्याचे चेअरमन दिपकभाई पाटील, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, तहसीलदार मिलिंद कुलकर्णी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ़ राजेंद्र वळवी आदी उपस्थित होते.नवापूर येथे आमदार शिरीषकुमार नाईक यांच्या घरापासून सर्वेक्षणास प्रारंभ करण्यात आला. सर्व नागरिकांनी आरोग्य पथकाला सहकार्य करावे व मोहिमेत सहभाग घ्यावा, असे आवाहन आमदार शिरीषकुमार नाईक यांनी यावेळी केले. प्रसंगी नगराध्यक्षा हेमलता पाटील, सहायक जिल्हाधिकारी तथा पालिका मुख्याधिकारी तृप्ती धोडमिसे, तालुका वैद्यकीय अधिकारी शशिकांत वसावे आदी उपस्थित होते. आमदार नाईक यांनी आदिवासी भाषेतून नागरिकांना मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले.धडगाव येथे तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे आणि तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.दिनेश वळवी यांच्या उपस्थितीत नगरसेवक फकीरा परमार यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधीक्षक संतोष परमार, डॉ.विष्णु हांगे, डॉ.मोहनकुमार मुलगीर आदी उपस्थित होते. मोहिमेच्या प्रतिज्ञेचे वाचन करून नागरिकांना कोरोनाबाबत घ्यावयाच्या दक्षतेविषयी माहिती देण्यात आली.दिवसभरात शहादा तालुक्यात तºहाडी, कलसाडी, सुलवाडा, नंदुरबार तालुक्यात ढेकवद तर धडगाव तालुक्यात सोन बुद्रुक, आणि राजबर्डी या गावातही सर्वेक्षण करण्यात आले. आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन तापमान, आॅक्सिजन पातळीची नोंद घेत आहेत़ तसेच घरात इतर आजार असणाºया व्यक्तिंविषयी माहिती घेत त्याच्या नोंदी ठेवत असल्याचे कळवण्यात आले आहे़