शहरं
Join us  
Trending Stories
1
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
2
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
3
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा झालमुरी स्टॉल, पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
4
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
5
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
6
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
7
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
8
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
9
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
10
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
11
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
12
IAS Aastha Singh : प्रेरणादायी यशोगाथा! आजोबांनी दाखवलं स्वप्न; अवघ्या २१ व्या वर्षी कोचिंगशिवाय आस्था बनली IAS
13
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
14
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
15
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
16
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
17
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
18
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
19
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
20
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमविवाह केल्याने बोरविहीर येथे युवकाचा खून; आई-वडील गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:27 IST

पोलीस सूत्रानुसार, नवापूर तालुक्यातील बोरविहीर येथील मुलीशी प्रेमसंबंधातून पळून जाऊन प्रेमविवाह केल्याचा राग आल्याने बोरविहीर येथील मुलीचे वडील व ...

पोलीस सूत्रानुसार, नवापूर तालुक्यातील बोरविहीर येथील मुलीशी प्रेमसंबंधातून पळून जाऊन प्रेमविवाह केल्याचा राग आल्याने बोरविहीर येथील मुलीचे वडील व दोन्ही भाऊ यांनी शुक्रवारी रात्री मयत अजय राजाराम गावित यांच्या घरात प्रवेश करून संदीप सखाराम गावित याने हातात चाकू घेऊन अजय गावित याच्या छातीत खुपसून निर्घृण वार करून युवकाचा खून केला. त्या चाकूच्या साहाय्याने सखाराम नूरजी गावित याने मयत युवकाची आई सावित्रीबाई राजाराम गावित यांच्या पोटात चाकू खुपसून दिला. यात सावित्रीबाई गंभीर जखमी झाल्या आहेत. तर समूवेल सखाराम गावित याने मयत युवकाचे वडील राजाराम नूरजी गावित यांना लाकडी काठीने हातापायावर वार केल्याने गंभीर जखमी केले. काही ग्रामस्थांनी अजयसह त्याच्या आई-वडिलांना रक्तबंबाळ अवस्थेत नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी अजयला मृत घोषित केले. तर सावित्रीबाई गावित गंभीर जखमी असून नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. वडील राजाराम गावित यांच्यावर नवापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नवापूर पोलिसांनी घटनास्थळी व उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन पंचनामा व चौकशीनंतर प्रकाश राजाराम गावित यांच्या फिर्यादीवरून नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी संदीप सखाराम गावित (२५), समूवेल सखाराम गावित (२७), सखाराम नरसी गावित (४८) तिघे रा. बोरविहीर येथील पिता-पुत्र आरोपींना रात्रीच पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांनी अटक केली. त्यांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. बोरविहीर गावात शांतात असून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अजय गावित याच्यावर शनिवारी बोरविहीर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. नंदुरबार फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळी रक्ताचे नमुने, ठसे घेतले व घटनेची माहिती जाणून घेतली.

नवापूर उपजिल्हा रुग्णालयात गर्दी

मयत अजय गावित यांच्या छातीत चाकू पाठीपर्यंत खुपसून निर्घृण हत्या केल्याने रक्तबंबाळ अवस्थेत नवापूर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. यावेळी बोरविहीर गावातील ग्रामस्थांनी रुग्णालयात व नवापूर पोलीस ठाण्यात मोठ्या संख्येने गर्दी केली व नातेवाइकांनी प्रचंड आक्रोश केला. मध्यरात्रीपर्यंत रुग्णालयात व पोलीस ठाण्यात ग्रामस्थांची गर्दी दिसून आली.

अनेक वेळा वाद मिटवला

नवापूर पोलीस ठाण्यात काही महिन्यांपूर्वी दोन्ही गटांतील सदस्यांची बैठक घेऊन वाद मिटविण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा किरकोळ वाद सुरूच होते. ग्रामस्थांनीही दोघांची समजूत घातली होती. परंतु काही उपयोग न झाल्याने शेवटी युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली.