शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणावरील स्थगिती त्वरित उठवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 12:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : मराठा आरक्षणावरील स्थगिती उठविण्यासाठी शासनाने तात्काळ प्रयत्न करण्यासोबत मराठा समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी ...


लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : मराठा आरक्षणावरील स्थगिती उठविण्यासाठी शासनाने तात्काळ प्रयत्न करण्यासोबत मराठा समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी शहादा तालुका मराठा समाजाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
शहादा तालुका मराठा समाजाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविण्यात आलेल्या त्याचप्रमाणे प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे यांना देण्यात आलेल्या निवेदनाचा आशय असा : गेल्या काही काळात संपूर्ण महाराष्ट्र राज्यात मराठा समाजातर्फे आरक्षण मिळविण्याकरिता व्यापक अशी आंदोलने करण्यात आली. त्यानंतर राज्य शासनाने मराठा समाजाला शैक्षणिक व नोकरीविषयक आरक्षण मंजूर केले. परंतु आरक्षणासंदर्भात न्यायालयीन लढा सुरु झाला आणि आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणास अंतरिम स्थगिती दिली आहे. या स्थगितीमुळे मराठा समाजात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली असून निराशाजनक परिस्थिती निर्माण झाली आहे .
मराठा समाज हा न्यायप्रिय असून न्यायप्रणालीचा आदर करणारा आहे. शासनाने मराठा समाजाच्या भावना समजून घ्याव्यात. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या प्रक्रिया मराठा समाजाचे आरक्षण कायम राहावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनावर सकल मराठा समाज क्रांती मोर्चाचे अनिल भामरे, अ‍ॅड.सरजू चव्हाण, डॉ.किशोर पाटील, देवाभाऊ बोराणे, विजय कदम, डॉ.चंद्रभान कदम, नीलेश मराठे, सागर मराठे, एन.डी. पाटील, समर करंके, गणेशराजे पाटील, शरद पाटील, कैलास सोनवणे, यांच्यासह मराठा समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
निकाल येईपर्यंत नोकर भरती करू नये
राज्यात आगामी कालावधीत होणाºया पोलीस भरती तसेच इतर शासकीय नोकरी भरती सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल येत नाही तोपर्यंत करू नये, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. शासनाने हा निकाल येण्याच्या आधी जर नोकर भरती केली तर मराठा समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात देण्यात आलेला आहे.