शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

मेडीकल कॉलेज कंत्राटी कर्मचा:यांच्या मुळावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 12:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयाकडे वर्ग करतांना राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कंत्राटी कर्मचा:यांची सेवा खंडीत करण्याचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयाकडे वर्ग करतांना राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कंत्राटी कर्मचा:यांची सेवा खंडीत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामुळे 100 पेक्षा अधीक कर्मचा:यांवर बेरोजगाराची कु:हाड कोसळणार आहे. दरम्यान, यापूर्वीच्या सर्व आदेशांमध्ये सर्व पदे कायम ठेवण्याचे म्हटले असतांनाही हा निर्णय होत असल्याने कर्मचारी हवालदिल झाले आहेत.  नंदुरबारात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजुर झाल्याने जिल्हा रुग्णालय टप्प्याटप्प्याने वैद्यकीय महाविद्यालयाकडे हस्तांतरीत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याअंतर्गत जिल्हा शल्य चिकित्सकांच्या अधिनस्त काही पदे वर्ग करणे, काही तसेच ठेवणे तर काही व्यपगत करणे अशा सुचना शासनाच्या अद्यादेशात देण्यात आलेल्या आहेत. याउलट सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध शासकीय योजनांअंतर्गत कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्यात आलेले अधिकारी, कर्मचारी यांची सर्व पदे पूर्वीप्रमाणेच जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या नियंत्रणाखाली राहतील असे आदेशात स्पष्ट म्हटलेले आहे. असे असतांना एनआरएचएमअंतर्गत असलेल्या सर्व कंत्राटी कर्मचा:यांना कार्यमुक्त करण्याच्या नोटीसा देण्यात आल्या आहेत. 30 सप्टेंबर रोजी या कर्मचा:यांची सेवा समाप्ती करण्याचे त्यात म्हटले आहे.याबाबत कर्मचा:यांनी आरोग्य मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण विभाग यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला आहे. आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांना देखील निवेदन देण्यात आले आहे. परंतु दखल घेतली जात नसल्याचे कंत्राटी कर्मचा:यांचे म्हणने आहे. जवळपास 100 पेक्षा अधीक अधिकारी व कर्मचा:यांवर यामुळे बेकारीची कु:हाड कोसळणार आहे. शासनाने याबाबत अद्यादेशातील तरतुदींप्रमाणे निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलनाचा इशारा या कर्मचा:यांनी दिला आहे. 

अध्यादेशाची तोडफोड.. जिल्हा रुग्णालय नंदुरबार वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाकडे पुर्णत: हस्तांतरीत करण्याच्या शासनाच्या 9 जानेवारी 2019 च्या अध्यादेशात  त्याबाबत स्पष्ट करण्यात आलेले नाही. याशिवाय जिल्हा शल्य चिकित्सकांनी राष्ट्रीय नागरि आरोग्य अभियानाचे अतिरिक्त संचालकांना लिहिलेल्या पत्रात काही पदे राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत व काही कार्यक्रम हे स्वतंत्र असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा यात कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप नसल्याचे म्हटले आहे. असे असतांनाही हे आदेश निघाल्याने कर्मचा:यांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.