शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
6
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
7
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
11
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
12
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
13
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
14
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
15
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
16
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
17
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
18
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
19
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
20
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
Daily Top 2Weekly Top 5

खेतियात ड्रोन कॅमेऱ्याद्वारे नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 12:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क खेतिया : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मध्य प्रदेश-महाराष्टÑ सीमा पूर्णत: बंद करण्यात आली असून खेतिया येथे विनाकारण ...

लोकमत न्यूज नेटवर्कखेतिया : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मध्य प्रदेश-महाराष्टÑ सीमा पूर्णत: बंद करण्यात आली असून खेतिया येथे विनाकारण फिरणाऱ्यांवर ड्रोन कॅमेºयाद्वारे नजर ठेवण्यात येत आहे. अत्यावश्यक काम असेल तर शहरी भागात पालिका मुख्याधिकारी व ग्रामीण भागात मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन बडवाणीचे जिल्हाधिकारी अमित तोमर यांनी केले आहे.बडवाणी जिल्ह्यातून कोणीही बाहेर जाऊ व येऊ शकणार नाही यासाठी प्रशासनाकडून कडक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. लॉकडाऊन काळात मेडिकल, भाजीपाला, दूध, किराणा आदी अत्यावश्यक सेवा असलेली दुकाने दिेलेल्या वेळेत सुरू आहेत. या व्यावसायिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे व कर्मचारी खेतिया शहर व ग्रामीण भागात गस्त घालून विनाकारण फिरणाºयांना चोप देत आहेत. तसेच खेतिया ड्रोन कॅमेराद्वारे नजर ठेवण्याचे काम सुरु आहे. प्रांताधिकारी सुमेरसिंह मुजाल्दे, तहसीलदार राकेश सस्तिया, नायब तहसीलदार जगन्नाथ वास्कले, मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ राठोड यांनी शहर व ग्रामीण भागात जाऊन नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन करीत आहेत.खेतिया हे मध्य प्रदेश-महाराष्ट्र सीमेवर असून चेकपोस्टवर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बडवाणीचे पोलीस अधीक्षक डी.आर. तेनिवार यांनी खेतिया चेकपोस्टला भेट देऊन पाहणी केली. खेतिया येथे युवा मिशन ग्रुपतर्फे खेतिया शहरात गोरगरीब, मोलमजुरी व गरजूंना भोजनाचे पाकीट तयार करून वाटप करण्यात येत आहेत. शहर व ग्रामीण भागातही सेवाभावी संस्था व दानशूर व्यक्तींकडून गरजूंना जेवणासह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे.खेतिया येथे पोलीस ठाण्याच्या आवारात सोशल डिस्टन्सिंग राखत शांतता समितीची बैठक झाली. तहसीलदार राकेश सस्ते, नायब तहसीलदार जगन्नाथ वास्कले व खेतिया प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.अरविंद किराडे, पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे व समितीचे सदस्य उपस्थित होते. तहसीलदार सस्ते व नायब तहसीलदार वास्कले यांनी सांगितले की, आर्थिक दुर्बल व गरीब परिवारांना तीन महिन्याचे राशन वाटप करण्यात आले आहे. आर्थिकदृष्ट्या गरीब परिवाराला शासनतर्फे देण्यात येणारी रक्कमही त्यांच्या बँक खात्यात जमा झाली आहे. कोरोनाच्या संकटकाळात नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे. आपल्या परिसरात अनोळखी नागिरक दिसल्यास तात्काळ पोलीस स्टेशन, नगरपालिकेला कळविल्याचे आवाहन त्यांनी केले. नगरपालिकेतर्फे दररोज साफसफाई व मशीनद्वारे फवारणी करण्यात येत असल्याची माहिती मुख्याधिकारी ईश्वर महाले यांनी दिली.