शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

12 तासांच्या कर्तव्यापूर्वी घरच्या बाप्पासाठी अवघे दोन क्षणही पुरेसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 12:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट देणा:या माता-भगिनींची सुरक्षा करण्यासाठी महिला पोलीस व होमागार्ड यांची नियुक्ती ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट देणा:या माता-भगिनींची सुरक्षा करण्यासाठी महिला पोलीस व होमागार्ड यांची नियुक्ती केली आह़े 12 तास डय़ूटी करणा:या या भगिनींच्याही घरी बाप्पाचे आगमन झाले असून तेथील जबाबदारी पार पाडून त्या येथील सुरक्षेचे कर्तव्य बजावत आहेत़ शहरातील श्रीमंत बाबा, श्रीमंत दादा, महाराणा प्रतापसिंह युवक मंडळ, शक्तीसागर यासह विविध ठिकाणच्या सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेश मूर्तीची स्थापना व आरास केली आह़े यातून याठिकाणी वाढती गर्दी लक्षात घेता सुरक्षा उपाय म्हणून दोन पुरुष, दोन महिला आणि दोन महिला व पुरुष होमगार्ड यांचे पथक नियुक्त केले गेले आहेत़ यातील बहुतांश हे नंदुरबार आणि परिसरातील रहिवासी आहेत़ बहुतांश पुरुष आणि महिला कर्मचा:यांच्या घरी बाप्पाचा उत्सव मोठय़ा भक्तीभावाने साजरा करण्यात येतो़ उत्सवात सकाळी 9 ते रात्री किमान 11 या काळात कर्तव्य बजावणा:या महिला पोलीस व होमगार्डला तारेवरची कसरत करावी लागत़े यावेळी त्यांच्यासोबत संवाद साधला असता, त्यांनी कर्तव्य महत्त्वाचे आह़े घरासाठी सकाळी लवकर उठून आरती, पूजन, स्वच्छतेची कामे करत असल्याचे सांगितल़े कुटूंबियांनाही डय़ूटीवर जाण्याची वेळ माहिती असल्याने त्यांच्याकडून सर्वतोपरी मदत केली जात़े यातून 12 तास केलेल्या कामाचा थकवा कुठल्याकुठे निघून जात असल्याचेही महिला पोलीस कर्मचारींनी सांगितल़े