शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

९५ हजार नागरिकांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 13:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमे अंतर्गत घरोघरी जाऊन आरोग्य सर्वेक्षण करण्यात येत असून ...


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमे अंतर्गत घरोघरी जाऊन आरोग्य सर्वेक्षण करण्यात येत असून बुधवारी एकाच दिवसात ९५ हजार ३९१ नागरिकांची आरोग्य  तपासणी करण्यात आली. आतापर्यंत एकूण दोन लाख ९५ हजार २५८ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक गावात आशा सेविका, अंगणवाडी कार्यकर्ती, एएनएम आणि अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत प्रत्येक व्यक्तीचा ताप आणि आक्सिजन पातळी मोजण्यात येत आहे. कुटुंबातील सदस्यास अन्य आजार असल्यास त्याची नोंद घेण्याबरोबरच कोरोनाबाबत जनजागृती करण्यात येत आहे.
एकूण  ४८२ पथकामार्फत हे सर्वेक्षण करण्यात येत असून आज २२ हजार १५६ घरांना भेटी देण्यात आल्या. आतापर्यंत एकूण ६७ हजारापेक्षा अधिक घरांना भेटी देऊन सर्वेक्षण करण्यात आले आहे.  त्यात नंदुरबार तालुक्यातील ५६ हजार ३५१, अक्कलकुवा २२ हजार ८१२, धडगाव ४८ हजार ४८४, नवापूर ६० हजार ८५६, शहादा ६९ हजार ७१० आणि तळोदा तालुक्यातील ३७ हजार ४५ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. सर्वेक्षणाच्या माध्यमातून कोरोनाची लक्षणे असलेल्या व्यक्तींची तातडीने स्वॅब तपासणी करून त्यांना कोविड केअर सेंटरला संदर्भित करण्यात येणार आहे. त्यामुळे कोरोनाची संपर्क साखळी खंडीत होण्यात मदत होऊ शकेल.
जि.प.सीइओंची भेट
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी नवापूर तालुक्यातील मोठे कडवान येथे भेट देऊन कर्मचाऱ्यांना मोहिमेबाबत मार्गदर्शन केले. यावेळी गट विकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, तालुका वैद्यकीय अधिकारी शशिकांत वसावे, विस्तार अधिकारी दिलीप कुवर, सरपंच बंधू गावीत उपस्थित होते. गौडा यांनी आॅक्सिमीटरद्वारे आॅक्सिजन पातळी मोजणे व थर्मल गनच्या योग्य वापराविषयी मार्गदर्शन केले. प्रत्येक नागरिकांची नीट नोंद घ्यावी, आजाराची लक्षणे असलेल्या नागरिकांची माहिती द्यावी, असे त्यांनी सांगितले.