शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

तळोद्यातील ठाणेदार गल्लीत रंगलेला जुगाराचा डाव हवालदारांनी केला उध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 12:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तळोदा शहरातील ठाणेदार गल्लीत रंगलेल्या जुगाराचा डावावर पोलीसांनी धाड टाकत पाच जणांवर कारवाई करुन ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तळोदा शहरातील ठाणेदार गल्लीत रंगलेल्या जुगाराचा डावावर पोलीसांनी धाड टाकत पाच जणांवर कारवाई करुन लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला़ लॉकडाऊन काळात जुगाराचा डाव खेळणाऱ्या या महाभागांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़तळोदा शहरातील भवर ठाणेदार गल्लीलगत असलेल्या शेतात जुगार सुरु असल्याची माहिती तळोदा पोलीसांना मिळाली होती़ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचार बंदी घोषित असताना हा जुगार सुरु असल्याने पोलीस पथकातील कर्मचाऱ्यांनी सोमवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास येथे धाड टाकली होती़ यावेळी त्याठिकाणी अशोक गोविंद ठाकरे, दिपक मोतीलाल चौधरी, मोहन नामदेव पाटील, मधुकर तारांचद महाले सर्व रा़ ठाणेदार गल्ली व राज मोहन चौधरी रा ब्राह्मणगल्ली हे पाच जण जुगार खेळत असल्याचे दिसून आले़ पोलीसांनी घटनास्थळावरुन ४ मोबाईल, २ मोटारसायकल व रोख रक्कम असा १ लाख ७७ हजार ५६५ रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे़ याबाबत पोलीस कॉन्स्टेबल अनिल पाडवी यांनी सोमवारी रात्री उशिरा तळोदा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अशोक ठाकरे, दिपक चौधरी, मोहन पाटील, मधुकर महाले, राज चौधरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक राठोड करत आहेत़सर्व पाच संशयितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथ रोग कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़