शहरं
Join us  
Trending Stories
1
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
2
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
3
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
4
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा 'झालमुरी स्टॉल', पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
5
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
6
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
7
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
8
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
9
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
10
भारताच्या माजी क्रिकेटपटूची राजकीय मैदानात दमदार एंट्री, बड्या नेत्याविरोधात घेतली मोठी आघाडी
11
'या' स्टॉकनं केलं मालामाल! ५ वर्षांत १४००% चं छप्परफाड रिटर्न, आज पुन्हा अपर सर्किट
12
वैशाख अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: राहु काळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, चंद्रोदयाची वेळ!
13
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
14
UPSC टॉपर घडवणाऱ्या शिक्षिकेचे विद्यार्थ्याकडून अपहण; १.९० कोटी लुटून हॉस्पिटलमध्ये लपला, कारण समोर
15
'सैराट'फेम अरबाज शेखने केला निकाह, कोण आहे 'सल्या'ची पत्नी? रिंकू राजगुरुनेही केली कमेंट
16
"'ट्विंकल-ट्विंकल' शिकण्यासाठी २.५ लाख द्यायचे?"; सिनियर केजीची फी पाहून पालक शॉक
17
दोन सिलिंडर, एकदाच रांगेत राहून भरा, दुप्पट फिरा...! या कंपनीने सीएनजीमध्ये सात सीटर कार लाँच केली
18
बंगालमध्ये सायनी घोष यांचं गाणंच ठरलं गेमचेंजर; भाजपला थेट सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचवलं
19
'खुल्लम खुल्ला प्यार' आता बंद! 'गर्लफ्रेंड कल्चर' BCCIला अमान्य, 'हे' ४ भारतीय काय करणार?
20
नक्कल करायलाही अक्कल लागते! रोहितच्या स्टाईलमध्ये बाबरचं सेलिब्रेशन; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Daily Top 2Weekly Top 5

वीज वितरण कंपनीची शासनाच्या १२ कार्यालयांकडे अर्ध्या कोटीची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:27 IST

नागरिकांपुढे पाणीटंचाईची समस्या तळोदा नगर पालिकेमार्फत शहरातील नागरिकांना ३२ कूपनलिकांमधून पाणीपुरवठा केला जात असतो. वीज वितरण कंपनीने थकीत वीज ...

नागरिकांपुढे पाणीटंचाईची समस्या

तळोदा नगर पालिकेमार्फत शहरातील नागरिकांना ३२ कूपनलिकांमधून पाणीपुरवठा केला जात असतो. वीज वितरण कंपनीने थकीत वीज बिलापोटी कनेक्शन कट केले आहे. पालिकेने आठ लाख रुपये भरले असले तरी अजूनही २७ कूपनलिकांचे कनेक्शन कट केलेले आहे. त्यामुळे तेथील पाणीपुरवठा खंडित झाला आहे. परिणामी या भागातील नागरिकांना कृत्रिम पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याचे काही नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. उर्वरित बिल नगर पालिका लवकरच भरणार असल्याचे सांगण्यात आले असले, तरी नागरिकांना अजून दोन दिवस पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे.

कंपनीचे दुजाभावाचे धोरण

शहरातील विविध शासकीय कार्यालयांकडून वीज वितरण कंपनीचे साधारण अर्ध्या कोटीपेक्षा अधिक वीज बिल थकले असताना कनेक्शन कट करण्याबाबत अधिकारी उदासीन भूमिका घेत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. वास्तविक सामान्य नागरिकांचे बिल थकले तर कनेक्शन कट करण्याची नोटीस बजावली जाऊन लवकरच वीजजोडणी कापली जाते. कंपनीच्या अशा दुजाभावाच्या धोरणाबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

ज्या शासकीय कार्यालयाकडे वीज बिल थकले आहे. त्यांच्या विभाग प्रमुखांना वीज बिल भरण्याबाबत तोंडी सूचना दिल्या आहेत. त्यांनी भरण्याचे आश्वासन देखील दिले आहे. तरीही लवकरात लवकर बिल आले नाही तर कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई करण्यात येईल.

-इम्रान पिंजारी, शहर अभियंता, वीज वितरण विभाग, तळोदा.