शहरं
Join us  
Trending Stories
1
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
2
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
3
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
4
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा 'झालमुरी स्टॉल', पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
5
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
6
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
7
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
8
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
9
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
10
भारताच्या माजी क्रिकेटपटूची राजकीय मैदानात दमदार एंट्री, बड्या नेत्याविरोधात घेतली मोठी आघाडी
11
'या' स्टॉकनं केलं मालामाल! ५ वर्षांत १४००% चं छप्परफाड रिटर्न, आज पुन्हा अपर सर्किट
12
वैशाख अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: राहु काळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, चंद्रोदयाची वेळ!
13
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
14
UPSC टॉपर घडवणाऱ्या शिक्षिकेचे विद्यार्थ्याकडून अपहण; १.९० कोटी लुटून हॉस्पिटलमध्ये लपला, कारण समोर
15
'सैराट'फेम अरबाज शेखने केला निकाह, कोण आहे 'सल्या'ची पत्नी? रिंकू राजगुरुनेही केली कमेंट
16
"'ट्विंकल-ट्विंकल' शिकण्यासाठी २.५ लाख द्यायचे?"; सिनियर केजीची फी पाहून पालक शॉक
17
दोन सिलिंडर, एकदाच रांगेत राहून भरा, दुप्पट फिरा...! या कंपनीने सीएनजीमध्ये सात सीटर कार लाँच केली
18
बंगालमध्ये सायनी घोष यांचं गाणंच ठरलं गेमचेंजर; भाजपला थेट सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचवलं
19
'खुल्लम खुल्ला प्यार' आता बंद! 'गर्लफ्रेंड कल्चर' BCCIला अमान्य, 'हे' ४ भारतीय काय करणार?
20
नक्कल करायलाही अक्कल लागते! रोहितच्या स्टाईलमध्ये बाबरचं सेलिब्रेशन; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Daily Top 2Weekly Top 5

नवापूर व धडगाव तालुक्यात अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिकांना मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:27 IST

यावेळी मार्गदर्शन करताना ॲड. खानोलकर यांनी गावच्या स्तरावर काम करणाऱ्या कार्यकर्तींनी व्यक्तिगत पातळी ते सामाजिक पातळी पर्यंतच्या आव्हानांना कसे ...

यावेळी मार्गदर्शन करताना ॲड. खानोलकर यांनी गावच्या स्तरावर काम करणाऱ्या कार्यकर्तींनी व्यक्तिगत पातळी ते सामाजिक पातळी पर्यंतच्या आव्हानांना कसे सामोरे जावे यावर संवाद साधला.

प्रसंगी त्या म्हणाल्या की, अंगणवाडी हे केवळ पोषण आहार पुरवठा केंद्र किंवा कुपोषण निर्मूलन पर्यंत मर्यादित न राहता त्या माध्यमातून मूल्यशिक्षण आणि चांगल्या सवयी या उद्देशालाही प्राधान्य देण्यात यावे. एखादी अंगणवाडी एका गावाला कोणत्या पद्धतीने जोडू शकते, त्याची ताकद काय आहे. यावर घेतलेल्या चर्चेत महिलांनी गावात स्वच्छतेच्या कामात गावाला एकत्र आणले तर मोठा बदल होताे. प्रत्येकीने आपल्यात निर्णय घेण्याची क्षमता आहे. आणि त्या निर्णयाची जबाबदारी घ्यायला स्वतच्या मनाची पक्की तयारी असू द्यावी.

२०१७ पासून जिल्ह्यात महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या माध्यमातून ठराविक ग्रामपंचायतीत ग्राम परिवर्तनाचे काम चालू आहे. यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीत पूर्वी ग्राम परिवर्तकांची नियुक्ती करण्यात आली होती. विविध प्रकारच्या १८ शाश्वत विकासाच्या मुद्द्यावर काम करणे हे अभियानाचे उद्देश होते. या अभियानाचे स्वरूप आता बदलले असून तालुका स्तरावर समन्वयकांच्या माध्यमातून हे काम सुरु असल्याची माहिती दोन्ही ठिकाणी झालेल्या कार्यशाळेत देण्यात आली.

दरम्यान या कार्यशाळांच्या माध्यातून ग्रामपंचायत अंतर्गत विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली आहे. यात नवापूर तालुक्यात अंगणवाडी पर्यवेक्षिकांची पदे रिक्त आहेत. यामुळे एका पर्यवेक्षिकेला १०० ते १०० पदांचा भार सांभाळावा लागत आहे. यामुळे पर्यवेक्षिकांना त्या-त्या अंगणवाड्यांना भेटी देता येत नसल्याची माहिती देण्यात आली.

धडगाव तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी माल वाहतुकीच्या समस्या मांडल्या. दरम्यान कार्यशाळेत अंगणवाडी सेविकांनी पालकांशी संवाद साधणे अत्यंत गरजेचे असल्याने त्या मुद्द्यावर लक्ष देत मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यशाळेत ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान अंतर्गत येणाऱ्या सर्व ग्रामपंचायतीच्या अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिकांनी ही सहभाग नोंदवला.