शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सोने-चांदीचे दर स्थिर झाल्याने सराफबाजाराकडे वळू लागले ग्राहक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 13:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सोने-चांदीचे दर कमी झाल्याने बाजारात ग्राहक परतला असून उलाढाल बऱ्यापैकी वाढली असल्याची स्थिती आहे़ ...

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सोने-चांदीचे दर कमी झाल्याने बाजारात ग्राहक परतला असून उलाढाल बऱ्यापैकी वाढली असल्याची स्थिती आहे़ बाजारात निर्माण झालेल्या स्थिरतेमुळे आगामी काळात सकारात्मक परिणाम दिसून येतील असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे़
गेल्या काही दिवसात सोन्या चांदीचे दर वाढू लागल्याने सराफ बाजारातील दुकानांमध्ये सोने चांदीचे दागिने घडवून घेणे तसेच खरेदी करण्यापेक्षा मोड देऊन पैसे करण्यावर भर दिला जात असल्याचे चित्र होते़ यातून बाजारात खरेदी-विक्रीचे व्यवहार मंदावले होते़ परिणामी बाजाराचे आर्थिक चलनवलन धोक्यात आले होते़ परंतु गेल्या १५ दिवसात बाजारपेठेने कूस बदलली असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोने चांदीचे दर कमी होणे तसेच कोरोना महामारीची धग काहीशी कमी होत असल्याचे जाणवू लागल्याने स्थानिक बाजारपेठेवर त्याचा परिणाम झाला आहे़ गुरुवारी सोन्याच्या दरात ग्रॅममागे ५० रूपयांची घट आल्याची माहिती देण्यात आली़ दिवसभरात सोन्याचा दर हा प्रतीग्रॅम ५ हजार १०० तर चांदी प्रतिकिलो ५८ हजार ८०० रूपये होता़ या दरांमध्ये घट येणे किंवा वाढ होण्याची शक्यता नसल्याची माहिती व्यापाºयांनी दिली आहे़ दसºयापर्यंत बाजारात सोन्या-चांदीची खरेदी वाढणार असल्याने त्यादृष्टीने तयारी केल्याची माहिती व्यापाºयांकडून देण्यात आली़
दरम्यान अधिकमासानिमित्त चांदी खरेदी होत असल्याने उलाढाल पूर्ववत होत असल्याची माहिती देण्यात आली आहे़ चांदीच्या विविध वस्तू खरेदी करण्यासाठी महिला बाजारात येत असल्याचे चित्र यावेळी दिसून आले़ नंदुरबार शहरात सरासरी दिवसभरात ७५ लाख रूपयांची उलाढाल सोने व चांदी खरेदीतून होत असल्याची माहिती आहे़


बाजारात सोने-चांदीचे दर कमी झाल्याने ग्राहक खरेदीसाठी परतला आहे़ हे दर येत्या काळापर्यंत स्थिर राहणार आहेत़ यातून बाजारपेठेला चांगला फिडबॅक मिळेल़ बाजारपेठेला येत्या काळात चांगले दिवस येतील ही शक्यता यातून निर्माण होत आहे़
-जगदीश सोनी, सोने-चांदी व्यावसायिक, नंदुरबाऱ