शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
6
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
7
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
11
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
12
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
13
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
14
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
15
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
16
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
17
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
18
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
19
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
20
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यात चाऱ्याच्या गाठींना आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 12:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : पपई वाहतूक करण्यासाठी वापरासाठी ठेवलेल्या चाºयाच्या गाठींना आग लागून व्यापाºयाचे सुमारे दोन लाखाचे नुकसान ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : पपई वाहतूक करण्यासाठी वापरासाठी ठेवलेल्या चाºयाच्या गाठींना आग लागून व्यापाºयाचे सुमारे दोन लाखाचे नुकसान झाले. शनिवारी दुपारी सव्वा वाजेच्या सुमारास प्रकाशा रस्त्यावरील हॉटेल नंदनवनमागील मोकळ्या जागेत घडली. परिसरातील नागरिक व पालिकेच्या अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली.शेतकऱ्यांकडून पपई खरेदीसाठी अनेक व्यापारी शहरात दाखल झाले आहेत. शहरातील रफिक कासम बागवान हे पपईची खरेदी-विक्री करतात. शहरातील प्रकाशा रस्त्यावर नंदनवन हॉटेलमागे असलेल्या मोकळ्या जागेत बागवान यांचा भाताच्या पेंडीचा (चारा) ढीग होता. शनिवारी दुपारी सव्वा वाजेच्या सुमारास सूर्याच्या प्रखर उष्णतेने कोरड्या चाºयाला आग लागली. त्यात सुमारे १६० गाठींचे नुकसान झाले. एक गाठ सुमारे अकराशे रुपये खर्चून राजकोट (गुजरात) येथून मागवली जाते. बागवान यांनी सुमारे दोन गाडी म्हणजेच १६० गाठी मागवून मोकळ्या जागेत ठेवल्या होत्या. पपईच्या तोडणीनंतर गाडीत वाहतुकीसाठी कोरड्या भाताच्या पेंडीचा वापर केला जातो. त्यामुळे पपई खराब होत नाही व पिकण्यास मदत होते. या उद्देशाने त्याचा वापर करतात. या मैदानाजवळ राहणारे पत्रकार सल्लाउद्दीन लोहार यांच्या निदर्शनास आग आली. त्यांनी लगेच परिसरातील नागरिकांना सांगितली. जमालुद्दीन लोहार, रफिक बागवान यांनी लागलीच आपल्या बोरवेल्स सुरू करून आग विझवण्याचा प्रयत्न केला. काही क्षणातच शहादा पालिकेचा अग्निशमन बंब दाखल झाल्याने आग आटोक्यात आली.दरम्यान, परिसरात मोटार गॅरेज असल्याने अनेक वाहने दुरुस्तीसाठी येतात. त्यामुळे याच मोकळ्या जागेत वाहनांच्या रांगा लागतात. परंतु सध्या लॉकडाऊन असल्याने सर्वत्र शुकशुकाट असल्याने मोठा अनर्थ टळला.