शहरं
Join us  
Trending Stories
1
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
2
Top Marathi News Live: शरद पवारांची भेट घेतल्याने राजकारणात चर्चांचे वादळ; सुनील तटकरेंनी मांडली भूमिका
3
होर्मुझ'मधून गॅस पुरवठा ठप्प, भारताचा 'प्लॅन बी' तयार! पाहा कशी केली जाते भरपाई
4
IPL 2026: "पहिल्या चेंडूपासूनच..." RCB विरुद्धच्या सामन्याआधी शेन वॉटसनचा KKR च्या खेळाडूंना कानमंत्र!
5
NEET Exam Paper Leak : NEET पेपर लीकमध्ये मोठा खुलासा! २ भावांनी डॉक्टरकडून ३० लाखांत खरेदी केला पेपर अन्...
6
मुलावर एकाधिकार दाखवण्याच्या आईच्या वृत्तीवर उच्च न्यायालयाची चिंता; वडिलांना मुलाला भेटण्याचा अधिकार ठेवला कायम 
7
Prateek Yadav : शाळेत मैत्री, ई-मेलवर प्रेम अन् १० वर्षांचा रोमान्स! अशी होती प्रतीक आणि अपर्णा यादव यांची लव्ह स्टोरी
8
४ दिवसांत ६०० रुपयांपेक्षा अधिकनं आपटला 'टाटा'चा हा शेअर; रेखा झुनझुनवालांचे २८०० कोटी बुडाले
9
‘हातावर चुंबन घेणे ही...’; टॅक्सीचालकाला न्यायालयाने सुनावली दोन वर्षे कारावासाची शिक्षा
10
Central Railway: आसनक्षमता ७२, प्रवाशांची संख्या ४००; ‘टीसी’वर ताण; टार्गेट आणि वाढत्या हल्ल्यांमुळे रेल्वे कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात
11
Sonia Gandhi: काँग्रेस नेत्या सोनिया गांधी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल, नेमकं कारण काय?
12
अधिक मास २०२६: संकल्पपूर्तीसाठी अधिक मासात गुरुचरित्राचे 'हे' निवडक अध्याय वाचणेदेखील ठरेल प्रभावी!
13
सिद्धार्थ जाधवच्या पत्नीला पाहिलंत का? बिजनेसवुमन आहे तृप्ती, करते 'हे' काम
14
Prateek Yadav : "कौटुंबिक वादानंतर डिप्रेशन…"; १३ वर्षे सोबत असलेल्या प्रतीक यादव यांच्या मित्राचा गौप्यस्फोट
15
राजकारणापासून दूर..; प्रतीक यादव काय काम करायचे? किती होती त्यांची संपत्ती? जाणून घ्या...
16
किती लाजिरवाणं आहे! 'कान्स'च्या रेड कार्पेटवर आलिया भटकडे फोटोग्राफर्सचं दुर्लक्ष? व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांचा चीनला मोठा इशारा! जिनपिंगना भेटण्यापूर्वीच इराणबाबत ठणकावून सांगितलं; काय म्हणाले?
18
Pune Nasrapur Case : सीसीटीव्ही, ‘शेव’ आणि टणक वस्तू...; नसरापूर प्रकरणात आणखी कोण सामील ?
19
ट्रम्प यांची टीका फोल! इराणची तटबंदी अधिक मजबूत; ३० क्षेपणास्त्र तळ अजूनही 'ॲक्टिव्ह'
20
ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे पद धोक्यात; गंभीर आरोप करत ८० मंत्र्यांनी फडकावले बंडाचे निशाण
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ‘त्या’ शेतातील पंचनामा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 21:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी: शहादा तालुक्यातील सुसरी धरणातील पाणी थेट गोदीपूर ते नवलपूर रस्त्यावर आल्याने हा रस्ताच गायब झाला ...

लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राह्मणपुरी: शहादा तालुक्यातील सुसरी धरणातील पाणी थेट गोदीपूर ते नवलपूर रस्त्यावर आल्याने हा रस्ताच गायब झाला आहे. हे पाणी शेतात जात असल्याने शेतकऱ्यांवर कंबरेएवढ्या पाण्यात उतरून कापूस वेचणी करण्याची वेळ आली असून, याकडे लोकप्रतिनिधीसह प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. त्या वृत्ताची दखल घेत महसूल विभागाने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे         केले. 
ब्राह्मणपुरी येथील शेतकऱ्यांची शेती सुसरी धरणालगत आहे. या धरणात मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्याने धरणातील पाणी शेतशिवारात येऊन पाणी साचून पीक खराब होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असते. ब्राह्मणपुरी येथील शेतकरी लिमजी छगन पाटील यांचे सुसरी धरणलगत गोदीपूर शिवारात शेत आहे. त्यांनी आपल्या साडेतीन एकर क्षेत्रात कापसाची लागवड केली होती.
सुसरी धरणाचे पाणी थेट शेतात साचल्याने कापूस पिकाचे नुकसान होत आहे तर काही प्रमाणात हाताशी आलेल्या कापसाची वेचणी स्वतः शेतकऱ्यांना धरणाच्या पाण्यात जीव धोक्यात टाकून करावी लागत आहे. 

नुकसन भरपाईची मागणी
धरणाचे पाणी शेतात साचून शेतकऱ्यांचे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असते. काही शेतकऱ्यांची शेती सुसरी धरणात गेल्याने त्यांना त्याचा मोबदला काही प्रमाणात मिळाला तर काही शेतकऱ्यांना मोबदलाच मिळाला नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच पेरणी केलेल्या पिकांमध्ये पाणी साचले असल्याने पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या पिकांचा मोबदला लवकरात लवकर देण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत ‘लोकमत’ने सोमवारी वृत्त प्रकाशित करताच महसूल विभागामार्फत संबंधित नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचा पंचनामा करण्यात आला. या वेळी तलाठी स्मिता पाटील, शेतकरी लिमजी छगन पाटील, रमेश पाटील, गोपाळ पाटील, दिनेश पाटील, कोतवाल भरत नेवरे आदी उपस्थित होते.