शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
5
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
6
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
7
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
8
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
9
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
10
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
11
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
12
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
13
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
14
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
15
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
16
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
17
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
18
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
19
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
20
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 

पोलीस पट्ट्याने मारतात या भितीने अर्ध्या रस्त्यातच केले ट्रान्झॅक्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 1:11 PM

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : पोलीस पट्ट्याने मारतात, या भितीने गारद झालेल्या फसवणूक प्रकरणातील संशयिताने भिवंडी ते शहादा प्रवासादरम्यानच ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : पोलीस पट्ट्याने मारतात, या भितीने गारद झालेल्या फसवणूक प्रकरणातील संशयिताने भिवंडी ते शहादा प्रवासादरम्यानच उद्योजकाच्या खात्यावर २६ लाख रूपये भरून देत स्वत:ची सुटका करुन घेतली. गेल्या काही १० दिवसांपूर्वीच शहादा येथील कृषी उद्योजकाची ६४ लाख रूपयात फसवणूक झाल्याचे हे प्रकरण आहे. शहादा येथील किशोर नरोत्तम पाटील यांच्याकडून भिवंडी येथील एका फार्मा कंपनीने चार टन पेपिन्स नावाचा पदार्थ खरेदी केला होता. यापोटी ऑगस्ट २०१९ पासून  कंपनीकडून किशोर पाटील यांना ६३ लाख रूपये देणे होते. परंतू त्यांच्याकडून ही रक्कम देण्यास सातत्याने टाळाटाळ करण्यात येत होती. पाटील यांनी मागणी करुनही रक्कम मिळत नसल्याने त्यांनी पोलीसात धाव घेतली होती. त्यांच्या फिर्यादीवरुन  पलक अभय केन्या, अभय अरूण केन्या, अरुण कुमार केन्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.  पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या आदेशाने सहायक  पोलीस निरीक्षक निलेश वाघ व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने थेट भिवंडी येथे जाऊन केन्या बंधूंची चाैकशी केली होती. यातील एकास सहायक पोलीस निरीक्षक वाघ हे ताब्यात घेऊन शहाद्याकडे निघाले होते. दरम्यान त्याने पोलीसीमारापासून बचाव करत २६ लाख रूपये किशोर पाटील यांच्या खात्यावर जमा करुन देत सुटका करवून घेतली आहे. याप्रकरणात किशोर पाटील यांचा चार टन माल खराब असल्याचे सांगून तिघांनी फसवणूक केली होती. दरम्यान आधी पाच लाख त्यांनी पाटील यांना दिले होते. परंतू नंतर २६ लाख देण्यासाठी टाळाटाळ करत होते. सोबतच पाच टन पेपीन्सची ऑर्डर देत त्याची  उचल न केल्याने नुकसान झाले होते. यामुळे एकूण ६३ लाख रूपयांच्या फसवणूकीची फिर्याद पोलीसात देण्यात आली होती.