शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीला घरी घेऊन जाण्यासाठी आलेल्या पतीचा सासरच्यांनी केला खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 12:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : माहेरी असलेल्या पत्नीची विनवणी करत तिला घरी घेऊन जाण्यासाठी सासुरवाडीला आलेल्या पतीचा सासू-सासरे आणि ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : माहेरी असलेल्या पत्नीची विनवणी करत तिला घरी घेऊन जाण्यासाठी सासुरवाडीला आलेल्या पतीचा सासू-सासरे आणि पत्नीने केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला़ याप्रकरणी तिघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करुन चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होत़े    2 ते 4 सप्टेंबर दरम्यान हा खुनाचा गुन्हा घडला होता़ सुरेश गुलाबसिंग वळवी (28) असे मयत पतीचे नाव असून तो गढीकोठडा ता़ तळोदा येथील रहिवासी आह़े घटना उघडकीस आल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक सपकाळे, पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देत चौकशी केली होती़ घटनेतील मयत सुरेश वळवी याचा विवाह चिनोदा येथील वंदनाबाई हिच्यासोबत झाला होता़ विवाहानंतर वंदनाबाई ही माहेरीच राहत असल्याने सुरेश वळवी हा तिला गढीकोठडा येथील सासरी घेऊन जाण्यासाठी येत होता़ यातून त्यांच्यात वादावादी होत होती़ 2 सप्टेंबर रोजी सुरेश हा वंदनाबाई हीला भेटण्यासाठी चिनोदा येथे गेला होता़ याठिकाणी त्याचा सासरे जंग्या मो:या नाईक याच्यासोबत वाद झाला होता़ यातून सुरेश यास सासरा जंग्या नाईक, सासू शांताबाई नाई आणि पत्नी वंदनाबाई यांनी मारहाण केली होती़ मारहाणीत काठीने डोक्यावर, गळ्याजवळ व डाव्या बरगडय़ांवर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला़ घटनेनंतर मयत सुरेश वळवी याच्या कुटूंबियांनी गढीकोठडा येथे त्याचा अंत्यविधी पूर्ण करत तळोदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली़ याबाबत मयताचे वडील गुलाबसिंग वळवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन जंग्या नाईक, शांताबाई नाईक व वंदनाबाई वळवी सर्व रा़ चिनोदा या तिघा संशयितांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला़ तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर पाकळे करत आहेत़ गुरुवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास तिघा संशयितांना तळोदा पोलीस ठाण्यात आणून पोलीस अधिका:यांनी  त्यांची चौकशी केली होती़ मयत सुरेश व वंदनाबाई यांना एक मुलगा असून या घटनेमुळे तळोदा तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आह़े