शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

नगरपंचायतीतून बाहेर पडण्यासाठी उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2020 12:53 PM

लोकमत न्यूज नेटवर्क धडगाव : नगरपंचायतींतर्गत येणार्या रोषमाळ बुद्रुक ग्रामस्थांना सुविधा मिळत नसल्याने त्यांनी नगरपंचायत हद्दीतून वगळण्यात यावे अशी ...

लोकमत न्यूज नेटवर्कधडगाव : नगरपंचायतींतर्गत येणार्या रोषमाळ बुद्रुक ग्रामस्थांना सुविधा मिळत नसल्याने त्यांनी नगरपंचायत हद्दीतून वगळण्यात यावे अशी मागणी केली होती. मागणीसाठी त्यांचा पाठपुरावा सुरू असून कारवाई न झाल्यास २१ ऑक्टोबरपासून आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला होता. या आंदोलनाला बुधवारपासून सुरूवात करण्यात आली. रोषमाळ बुद्रुक येथील युवक ग्रामस्थ सध्या उपाेषणाला बसले असून वेळोवेळी मागणी मान्य होईपर्यंत ग्रामस्थ या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. धडगाव नगरपंचायतीत समावेश असलेल्या रोषमाळ बुद्रुक ग्रामपंचायतींतर्गत अनेक विकासकामे गेल्या पाच वर्षात पूर्ण झालेली नाहीत. केवळ लोकसंख्येचा निकष लावून धडगावपासून लांबवर असलेल्या रोषमाळ बुद्रुक गाव व पाड्यांचा नगरपंचायतीत समावेश करण्यात आला आहे. परीणामी विविध शासकीय योजनांसह पेसांतर्गत लाभापासूनही ग्रामस्थ वंचित होत आहेत. यामुळे त्यांच्याकडून राज्यपाल, मुख्यमंत्री, नगरविकास विभाग, जिल्हाधिकारी, जिल्हा परीषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला आहे. सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या पाठपुराव्याला यश येत नसल्याने गावातील युवकांनी आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता. यांतर्गत बुधवारी खर्डीपाडा येथील युवराज रोहिदास खर्डे, मानसिंगपाडा येथील संदीप नारसिंग पावरा, सिनीपाडा येथील विरसिंग गुंड्या पावरा, जेलसिंग पाडा येथील महेंद्र मोहन पावरा हे युवक उपोषणाला बसले आहेत. सोशल डिस्टन्सिंग तसेच कोविड नियमांचे पालन करुन त्यांच्याकडून आमरण उपोषण करण्यात येत आहे.