शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

शेतक:यांच्या डोक्यावर 95 लाखांचे कर्ज उभे करून संस्था झाली पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 12:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शेतक:यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा करून खडकी, ता.मालेगाव येथील संस्थेने पोबारा केला. तब्बल 95 ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शेतक:यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा करून खडकी, ता.मालेगाव येथील संस्थेने पोबारा केला. तब्बल 95 लाख 50 हजारांचे कर्ज आता शेतक:यांना फेडावे लागणार आहे. शेतात पॉली हाऊस करून देण्याच्या बहाण्याने हे कर्ज प्रकरणे संबधीत संस्था आणि बँक ऑफ महाराष्ट्राच्या नवापूर शाखेचे तत्कालीन अधिका:यांनी संगनमताने हा प्रकार केल्याचा शेतक:यांचा आरोप आहे. नवापुरातील पुष्पा गिरीश गावीत या शेतकरी महिलेसह आणखी दोन शेतक:यांना शेतात पॉली हाऊस बांधून देतो असे अमिष खडकी, ता.मालेगाव येथील तिरुपती इरिगेशन संस्थेचे संचालक नंदराज देवरे यांनी दिले. त्यासाठी बँकेतून कर्ज देखील मिळवून देण्याचे आश्वासन त्याने दिले. शेतक:यांनी त्याच्यावर विश्वास ठेवून बँकेत कर्ज प्रकरणे केली. त्यासाठी आवश्यक ते सर्व कागदपत्रे सादर केली. बँकेनेही काहीही न पहाता किंवा काम सुरू झाले, पुर्ण झाले की नाही याची खातरजमा न करता 2014 पासून शेतक:यांना कर्ज मंजुर केले. कर्जाची रक्कम परस्पर तिरुपती इरिगेशन संस्थेलाही अदा केली गेली. परंतु संस्थेने पॉली हाऊसचे बांधकाम केवळ सुरू करण्याचा बहाणा केला. त्यानंतर काम पुढे सरकलेच नाही. पैसे घेवून संस्था इकडे फिरकली नाही. आपण फसविले गेल्याचे लक्षात आल्यावर पुष्पा गिरीश गावीत यांनी नवापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्याचा निर्णय घेतला.गावीत यांच्या फिर्यादीवरून नंदराज देवरे, बँकेचे तत्कालीन व विद्यमान व्यवस्थापक, रोखपाल आणि सहायक शाखा व्यवस्थापक यांनी काम वेळेत पुर्ण करून न देता फसवणूक केली. बँक अधिका:यांनी कामाची खात्री करून टप्प्याने कर्ज रक्कमेचे वितरण करणे आवश्यक असतांना संस्थेस फायदा व्हावा या उद्देशाने पुर्ण कर्ज रक्कम वितरीत करून संस्थेचा आर्थिक फायदा केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरून या सर्वाविरुद्ध फसवणूक, संगनमत करून आर्थिक गैरव्यवहार अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरिक्षक डी.एस.शिंपी करीत आहे.