तळोदा उपजिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्षात सुविधांची वानवा

By Admin | Updated: May 8, 2017 12:41 IST2017-05-08T12:41:11+5:302017-05-08T12:41:11+5:30

केवळ एकाच पंख्याने हाकला जातोय कारभार

Facilities in the heat stroke chamber in Taloda subdivision hospital | तळोदा उपजिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्षात सुविधांची वानवा

तळोदा उपजिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्षात सुविधांची वानवा

 कोठार, जि.नंदुरबार, दि.8- तळोदा येथील उपजिल्हा रुग्णालयातील उष्माघात कक्षात सोयीसुविधांची वाणवा असून हा उष्माघात कक्ष केवळ नावालाच उरला आह़े

गेल्या महिन्यापासून चांगलेच तापत असून सर्वत्र उष्णतेची लाट पसरली आह़े यामुळे जनजीवनदेखील विस्कळीत झाले आह़े अनेक नागरिकांना उष्माघाताचा त्रासही जाणवत आह़े 
तळोदा उपजिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आला आहे परंतु हा कक्षाला भेट दिल्यानंतर समोर येणारी  वास्तविकता विचार करायला भाग पाडणारी आह़े 
उष्माघात कक्षात कोणीही हजर नसल्याचे दिसून येत आह़े उष्माघात कक्षात सुमारे चार ते पाच पलंग असून याठिकाणी केवळ एकाच पंख्याची व्यवस्था करण्यात आली आह़े त्याचप्रमाणे रुग्णांना थंड पाण्याची व्यवस्था मिळावी असे अपेक्षीत आह़े परंतु पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था नसल्याने पाण्यासाठी तारांबळ उडत आह़े 
दरम्यान, मागील तीन वर्षापासून नियमितपणे उष्माघात कक्ष स्थापन करण्यात येत असून या तीन वर्षात एकही उष्माघाताचा रुग्ण अद्याप या कक्षात दाखल झाला नसल्याचे सांगण्यात आल़े 
उष्माघात कक्ष असल्याने कक्षातील वातावरण थंड राहिल याची काळजी घेणे अपेक्षीत असताना यासाठी ठिकाणी केवळ एकच पंख्यावर उपजिल्हा रुग्णालय आपला कारभार हाकत असल्याचे दिसून येत आह़े त्यामुळे एखादी उष्माघाताचा रुग्ण आल्यास ऐनवेळी रुग्णालय काय करणार असा प्रश्नही सर्वसामान्यांना आता भेडसावत आह़े

Web Title: Facilities in the heat stroke chamber in Taloda subdivision hospital