शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
2
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
3
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
4
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
5
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
6
Top Marathi News Live: नाशिक: भोंदू अशोक खरातविरुद्ध SITकडून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल
7
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
8
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
9
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
10
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
11
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
12
Travel : लडाखमध्ये इंजिन बंद असूनही गाड्या आपोआप चढतात डोंगर; या 'मॅग्नेटिक हिल'चं रहस्य काय?
13
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
14
भयंकर! फक्त एका लिंबूसाठी १२ वर्षांच्या मुलाची हत्या; संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक
15
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
16
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
17
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
18
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
19
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
20
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकीदारांची मालमत्ता जप्ती मोहीम

By admin | Updated: March 18, 2017 00:22 IST

कर वसुली : नंदुरबार पालिका करणार कारवाई

नंदुरबार : पालिकेच्या कर वसुली मोहिमेअंतर्गत सोमवारपासून मोठ्या थकबाकीदारांवर थेट जप्तीची कारवाई सुरू करण्यात येणार आहे. जप्ती करण्यात आलेली मालमत्ता पालिकेच्या नावावर होणार असल्याची माहिती मुख्याधिकारी गणेश गिरी यांनी दिली.
शासनाने सर्वच पालिकांना १०० टक्के कर वसुलीचे उद्दिष्ट दिले आहे. त्यापेक्षा कमी वसुली झाल्यास पालिकांना मिळणारी विविध अनुदाने बंद करण्याचे किंवा कमी करण्याचेदेखील पालिकेने ठरविले आहे. शिवाय अधिकारी व कर्मचाºयांवरही टांगती तलवार राहणार आहे. ही बाब लक्षात घेता नंदुरबार पालिकेने वसुलीची धडक मोहीम सुरू केली आहे. मोठ्या थकबाकीदारांची नावे त्यांच्याकडील थकीत रकमेसह वृत्तपत्रातून प्रसिद्ध करण्यात येत आहेत. त्यानंतरची पुढची पायरी ही संबंधित मालमत्ताधारकांच्या मालमत्ता जप्त करण्याची राहणार आहे. त्यासाठी अशा थकीत मालमत्ताधारकांना आधी नोटिसा देण्यात आलेल्या आहेत. आता जप्तीच्या नोटिसा बजावण्यास सुरुवात झाली आहे. दोन दिवसात नोटिसा बजावण्याची प्रक्रिया झाल्यानंतर सोमवारपासून थेट मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. ३० हजारांपेक्षा किंवा ५० हजारांपेक्षा जास्त थकबाकीदारांवर ही कारवाई सुरू करण्यात येणार आहे.  जप्तीच्या कारवाईनंतर १५ दिवसानंतरही थकबाकी न भरल्यास त्या मालमत्तेचा लिलाव करण्यात येणार आहे. लिलावात कुणी खरेदी न केल्यास पालिका ती मालमत्ता आपल्या नावावर करणार असल्याची माहिती मुख्याधिकारी गणेश गिरी यांनी दिली.