शहरं
Join us  
Trending Stories
1
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
2
Election Results 2026 LIVE: "बंगालच्या विकासासाठी भाजप आता कोणतीही कसर सोडणार नाही"; ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींची प्रतिक्रिया
3
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
4
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
5
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
6
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
7
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
8
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
9
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
10
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
11
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
12
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
13
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
14
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
15
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
16
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
17
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
18
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
19
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
20
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
Daily Top 2Weekly Top 5

सुरळीत रेशन वाटपासाठी भरारी पथकांची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 12:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : तालुक्यातील शिधापत्रिका धारकांना सुरळीत रेशन वाटपासाठी येथील महसूल प्रशासनाने नायब तहसीलदारांचे चार भरारी पथकांची ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : तालुक्यातील शिधापत्रिका धारकांना सुरळीत रेशन वाटपासाठी येथील महसूल प्रशासनाने नायब तहसीलदारांचे चार भरारी पथकांची नियुक्ती केली असून हे पथक काळाबाजारावर वॉच ठेवणार आहे. असे असले तरी या पथकांची कडक भूमिका घेण्याची अपेक्षा आहे.कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाने समाजातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना तीन महिन्यांचे रेशन उपलब्ध करून दिले आहे. आता तर लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे मोफत रेशन उपलब्ध करून देणार आहे. तालुकास्तरावर मागील उपलब्ध झालेले नियतनाचेच सद्या वाटप सुरू आहे. हे नियतन अधिक सुरळीत होण्यासाठी तसेच पुढील रेशन वाटपाच्या पार्श्वभूमीवर येथील महसूल प्रशासनाने जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार नायब तहसीलदारांच्या पर्यवेक्षणाखाली चार भरारी पथकांची नियुक्ती केली आहे.यात तळोदा मंडळ नायब तहसीलदार शैलेंद्र गवते, मंडळ अधिकारी एस.बी. पाटील, बोरद मंडळाचे नायब तहसीलदार रिनेश गावीत, मंडळ अधिकारी माया मराठे, प्रतापपूर मंडळाचे श्रीकांत लोमटे व मंडळ अधिकारी सी.बी. नायक, सोमावल मंडळ नायब तहसीलदार रामजी राठोड, मंडळ अधिकारी डी.एस. निकम यांच्या सोबत संबंधीत गावांचा तलाठ्यांचा समावेश करण्यात आला आहे.हे भरारी पथक आपल्या मंडळातील रेशन दुकानदारांकडून शिधापत्रिकाधारकांना सुरळीत धान्य दिले जात आहे की नाही यावर वॉच ठेवणार आहेत. याशिवाय प्रति व्यक्तीस पाच किलो प्रमाणे धान्य वितरित होत आहे का? या प्रकरणी प्रत्यक्ष दुकानदाराकडे पडताळणी करणार आहे. या उपरांत संबंधीत दुकानदाराकडे अनियमितता आढळून आली तर थेट ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश पथकास देण्यात आले आहे.शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजातील गरीब घटकांना पुरेसे रेशन मिळण्यासाठी ठोस प्रयत्न केले आहेत. कारण अधिकाऱ्यांच्या भरारी पथकांबरोबरच गावपातळीवर ग्राम समितीचीही नेमणूक केली आहे. या ग्रामसमितीत संबंधीत गावाचा सरपंच, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक व कोतवाल अशा पाच जणांचा समावेश आहे. ही समिती एप्रिल ते जूनपर्यंत शासनाकडून पात्र शिधापत्रिकाधारकांना दिले जाणारे मोफत रेशनच्या वाटपावर प्रत्यक्ष दुकानदाराकडे उपस्थित राहून देखरेख करतील. या उपरांतही जर काळा बाजाराच्या तक्रारी आल्या तर समितीलाही जबाबदार धरुन कठोर कारवाई करण्याची ताकीद देण्यात आली आहे.