शहरं
Join us  
Trending Stories
1
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
2
Election Results 2026 LIVE: "बंगालच्या विकासासाठी भाजप आता कोणतीही कसर सोडणार नाही"; ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींची प्रतिक्रिया
3
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
4
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
5
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
6
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
7
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
8
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
9
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
10
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
11
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
12
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
13
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
14
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
15
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
16
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
17
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
18
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
19
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
20
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमुळे रामनवमी साध्या पद्धतीने साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 12:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व मंदिरे बंद असल्याने जिल्ह्यात साध्या पद्धतीने रामनवमी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व मंदिरे बंद असल्याने जिल्ह्यात साध्या पद्धतीने रामनवमी साजरी करण्यात आली.प्रतापपूर, ता.तळोदा येथील राम मंदिरात रामनवमी उत्सावानिमित्त ४८ वर्षांपासून आयोजित करण्यात येणाऱ्या श्रीमद् भागवत कथा सप्ताहाला यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमिवर शासनाने सर्व कार्यक्रम रद्द केल्याने खंड पडला आहे. या वेळी पुजारी भालचंद्र पाठक व तुंबा राजपूत यांनी पहाटे चार वाजता काकड आरती केली. त्यानंतर सकाळी सात वाजता दिलीप पाटील यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. त्यानंतर दुपारी १२ वाजता रामजन्मोत्सव साजरा करण्यात आल्याची माहिती मंदिर ट्रस्टचे संचालक भिमसिंग गिरासे यांनी दिली.कहाटूळला रक्तदान शिबिरकहाटूळ, ता.शहादा येथे रामनवमी निमित्ताने रक्तदान शिबिर घेण्यात आले. कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे देशात मोठे संकट उभे राहण्याची दाट शक्यता आहे. त्या अनुषंगाने राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रक्तदान करण्याचे आव्हान संपूर्ण महाराष्ट्राला केले आहे.गावात रामनवमीनिमित्ताने गेल्या वर्षापासून श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात येत होते. परंतु कोरोनावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी जिल्ह्यातील सर्व धार्मिक कार्यक्रम रद्द करण्याच्या सूचना या दिल्या होत्या. त्यामुळे कहाटूळ येथील भागवत समितीने देखील श्रीमद्भागवत कथेचा कार्यक्रम रद्द करून देशातील उद्भवलेल्या संकटाला मदत म्हणून भव्य रक्तदान शिबीर घेतले. शिबिरास ग्रामस्थांनी उस्फुर्त प्रतीसाद दिला शिबिरासाठी रामकृष्ण मंदिराचे पुजारी दीपक कुलकर्णी आणि भागवत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.जिल्ह्यातील राम मंदिरांमध्येही रामनवमीनिमित्त आरती व प्रसाद वाटप करण्यात आला.