शहरं
Join us  
Trending Stories
1
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
2
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
3
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा झालमुरी स्टॉल, पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
4
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
5
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
6
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
7
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
8
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
9
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
10
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
11
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
12
IAS Aastha Singh : प्रेरणादायी यशोगाथा! आजोबांनी दाखवलं स्वप्न; अवघ्या २१ व्या वर्षी कोचिंगशिवाय आस्था बनली IAS
13
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
14
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
15
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
16
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
17
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
18
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
19
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
20
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या वडीलांनाच उपचारासाठी फिरफिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 12:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : कोरोना या विषाणूच्या लढाईत डोंबिवली येथे कोरोनाग्रस्तांसाठी २४ तास आहोरात्र सेवा देणाºया अक्कलकुवा तालुक्यातील ...

लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : कोरोना या विषाणूच्या लढाईत डोंबिवली येथे कोरोनाग्रस्तांसाठी २४ तास आहोरात्र सेवा देणाºया अक्कलकुवा तालुक्यातील नाला येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.पंकज करणसिंग पाडवी यांच्या आजारी वडिलांना अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालय तसेच खाजगी रुग्णालयात कोणताही उपचार न करता फिरवाफिरव करावी लागल्याची मन खिन्न करून टाकणारी घटना घडल्याने डॉक्टरांना नेहमी देव संबोधणारा समाज आजच्या परिस्थितीत हवालदिल झाला असून आश्चर्य व्यक्त होत आहे.याबाबत आढावा घेतला असता मन गहिवरून टाकणारी घटना पुढे आली ती अशी : अक्कलकुवा तालुक्यातील नाला येथील डॉ.पंकज पाडवी सध्या डोंबिवली येथील एआयएमएस हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या रूग्णालयात रुग्णांना २४ तास सेवा देत आहेत. त्यांचे वडील व पं.स.चे माजी सदस्य करणसिंग पाडवी यांना १५ दिवसापासून ताप येत होता. त्यांच्या रक्ताची तपासणी केली असता टायफाईड असल्याचे निदान झाले. संपूर्ण देशभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन झाल्यामुळे त्यांना परवा अक्कलकुवा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. या रुग्णालयात त्यांना हातही न लावता खाजगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. खाजगी रुग्णालयांमधील डॉक्टरांनीही त्यांच्यावर उपचार करण्यास स्वारस्य न दाखवता इतरत्र दवाखान्यात जाण्याचे सूचवले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तात्काळ उपचार करणे आवश्यक असताना माझे वडील व त्यांच्यासोबत असलेली एक गरोदर महिला रुग्ण यांच्यावर कोणत्याही शासकीय अथवा खासगी रुग्णालयात उपचार झाले नसल्याचा संदेश मला मिळाल्याने वैद्यकीय क्षेत्रात असल्याने खूप अस्वस्थ झालो. त्याचवेळी मी या संपूर्ण घटनेची माहिती लिहून जिल्हा प्रशासन व तालुका प्रशासनासमोर घडलेला हा गंभीर प्रकार यावा म्हणून केवळ सामाजिक प्रसार माध्यम हे एकच प्रभावी माध्यम सद्यस्थितीत तरी असल्याने घडलेला प्रकार मी व्हायरल केला. हा प्रकार व्हायरल झाल्याने शहरातील आमलीबारी फाटा येथील डॉ.ईदसिंग वळवी यांनी पुढाकार घेत रुग्णाला अ‍ॅडमिट करून त्यांच्यावर उपचार सुरू केले आहेत. हा घडलेला प्रकार व्हायरल झाल्याने जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड, प्रभारी तहसीलदार विजय कचवे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.स्वप्निल मालखेडे यांनी त्वरित दखल घेत घडलेल्या प्रकाराची गंभीरतेने दखल घेऊन रुग्णावर उपचार करण्याच्या सूचना दिल्या.