शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
6
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
7
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
11
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
12
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
13
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
14
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
15
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
16
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
17
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
18
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
19
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
20
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये जुगार मांडणाऱ्यांवर पडली धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 12:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाला थोपवण्यासाठी देशात लॉकडाऊन असताना पत्त्यांचा जुगार मांडून साथरोग नियंत्रणात आणण्यासाठी काढलेल्या आदेशांचा खेळ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाला थोपवण्यासाठी देशात लॉकडाऊन असताना पत्त्यांचा जुगार मांडून साथरोग नियंत्रणात आणण्यासाठी काढलेल्या आदेशांचा खेळ करणाºया तळोदा पालिकेच्या नगरसेवकासह सहा जणांना एलसीबीच्या पथकाने मुद्देमालासह ताब्यात घेतले़ जुगार अड्ड्यावर पडलेल्या धाडीमुळे तळोद्यात एकच खळबळ उडाली असून जुगार अड्ड्यातून पथकाने साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे़एलसीबीचे पोलीस निरीक्षक किशोर नवले यांना तळोदा शहरातील शहादा रोडवर हॉटेल सद्भावना समोर असलेल्या दुकानात नावाने काही लोक जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली होती़ त्यानुसार शनिवारी पथकाने या भागात चौकशी केल्यावर जुगार सुुरु असल्याचे स्पष्ट झाले होते़ यानंतर शनिवारी सायंकाळी पोलीस निरीक्षक नवले यांनी पथकासह शहादा रस्त्यालगत असलेल्या दुकानात धाड टाकली होती़ यावेळी पथकाला योगेश शांताराम मराठे, रा. मराठा चौक, तळोदा, भरत मक्कन चौधरी रा. गणपती गल्ली तळोदा, नगरसेवक हितेंद्र सरवनसिंग खाटीक रा. पोस्ट आॅफीस समोर, तळोदा, महेश सुवालाल अग्रवाल रा.आदीवासी मोहल्ला, वाकाचार रस्ता ता. निजर जि तापी (गुजरात), किशोर एकनाथ भाट रा. सुभाष टॉकीज जवळ तळोदा, सुभाष बाबु गोसावी रा. वेळावद ता. शहादा हे सहा जण पत्ते खेळत असताना मिळून आले़ सर्व सहा संशयित बसून तीन पत्तीचा जुगार खेळत होती़ धाड पडल्यानंतर तेथून निसटण्याचा त्यांचा प्रयत्नही अयशस्वी झाला़ सर्व संशयितांची झडती घेत त्यांच्याकडून साडेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला़ तळोदा शहरातील मन बहुउद्देशीय संस्थेच्या नावाने हा सोशल क्लब सुरु होता़याबाबत पोलीस शिपाई राजेंद्र चिंतामण कारले यांनी फिर्याद दिली असून जुगार खेळणाºया सहा जणांसोबतच मन सोशल क्लबच्या ११ पदाधिकाऱ्यांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ बहुउद्देशीय संस्थेच्या आड सोशल क्लबला परवानगी देत जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या मनाई आदेशांचे तसेच आपत्ती व्यवस्थापन आणि साथरोग कायदा कलमांचे उल्लंघन केल्याने पदाधिकाºयांविरोधातही गुन्हा दाखल झाला आहे़ही कारवाई पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक किशोर नवले, पोलीस उपनिरीक्षक योगेश राऊत, पोलीस हेड कॉन्स्टेबल दिपक बाळकृष्ण गोरे, पोलीस नाईक दादाभाई मासूळ, प्रमोद सोनवणे, मनोज नाईक, विजय ढिवरे, पोलीस शिपाई शोएब जब्बार शेख, सतीष घुले यांच्या पथकाने ही कारवाई केली़पोलीस पथकाने केलेल्या चौकशीत मन बहुउद्देशीय संस्थेत नगरसेवक हितेंद्र खाटीक, योगेश मराठे, भरत चौधरी, कमल परदेशी, गायत्री चौधरी, आसिफ शेख इब्राहिम, निलीमा चौधरी, आशा पाटील, वर्षा परदेशी, सर्व रा. तळोदा हे सदस्य आहे तर याच संस्थेकडून नोंदणी असलेल्या सोशल क्लबमध्ये हितेंद्र खाटीक, योगेश शांताराम मराठे, भरत चौधरी, कमल परदेशी, कमलेश पाडवी, विनोद मराठे, संजय गोपीचंद वानखेडे, धर्मराज सागर पवार, गजेंद्र कोचरु पाडवी, सुनील रमेश पाडवी हे सर्व कार्यकारी मंडळात आहेत़पथकाने येथे धाड टाकल्यानंतर पत्ते खेळणाºयांसह तेथील टेबल आणि इतर साहित्य असा एकूण ५ लाख ४५ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल पोलीसांकडून जप्त करण्यात आला आहे़ पोलीसांनी अचानक टाकलेल्या या धाडीची तळोदा दोन दिवसांपासून चर्चा रंगली आहे़ रविवारी पहाटे सर्व संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला़