शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याला जास्तीत जास्त रेमडीसीवर मिळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 12:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात आदिवासी विकास विभागातर्फे रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. शासनाकडून जास्तीत जास्त रेमडीसीवर ...

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात आदिवासी विकास विभागातर्फे रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. शासनाकडून जास्तीत जास्त रेमडीसीवर इंजेक्शन उपलब्ध करून द्यावीत अशी अपेक्षा पालकमंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी यांनी मुख्यमंत्र्यांसोबत आयोजित व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये व्यक्त केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाशिक विभागातील सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री व अधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. पालकमंत्री अ‍ॅड. के.सी.पाडवी , जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके, तहसीलदार उल्हास देवरे आदी उपस्थित होते. नंदुरबार जिल्ह्यातील काही भाग डोंगराळ आणि दुर्गम असतानादेखील येणाºया अडचणींवर मात करून मोहिम यशस्वी करण्यासाठी आरोग्य यंत्रणा चांगले प्रयत्न करते आहे, असे पालकमंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी यांनी सांगितले. ते म्हणाले, जिल्ह्यात कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली असून त्यामुळे कोरोना साखळी खंडीत करण्यास मदत होत आहे. बाधित व्यक्तींचा चांगल्या आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न असून जिल्ह्यात लवकरच आॅक्सिजन प्लँटचे काम सुरू करण्यात येणार आहे. नागरिकांमध्ये व्यापक प्रमाणात जागृती करण्याचे प्रयत्न करण्यात येत असून त्यासाठी स्थानिक भाषेचादेखील उपयोग प्रभावी ठरला आहे. रुग्णांच्या वाहतूकीसाठी रुग्णवाहिकांची संख्या वाढविण्यात येत आहे. आदिवासी विभागामार्फतदेखील रुग्णवाहिका घेण्यात येणार असून शासनानेदेखील त्यासाठी व रेमडीसीवर उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हाधिकारी डॉ.भारुड म्हणाले, जिल्ह्यात आतापर्यंत पाच लाख १९ हजार व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे, तर एक लाख १६ हजार घरांना भेटी देण्यात आल्या आहेत. काही ग्रामपंचायतींनी आरोग्य सुविधेसाठी वाहनांची व्यवस्था केली आहे. जिल्ह्यात ९५ टक्केपेक्षा जास्त चाचण्या आरटीपीसीआर लॅबच्या माध्यमातून होत आहे. आठ खाजगी ठिकाणी कोरोना उपचाराची व्यवस्था करण्यात आली असून जिल्हा रुग्णालयात २०० बेड्सची व्यवस्था आहे, अशी माहिती त्यांनी दिली.