नवापुर तालुक्यात लाभार्थींना धान्य वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 11:47 AM2020-06-04T11:47:16+5:302020-06-04T11:47:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नवापुर तालुक्यातील तीन गावांमध्ये ७४ आदिवासी लाभार्थी कुटूंबांना आदिवासी विकास विभागाकडून मोफत धान्याचे वितरण ...

Distribution of foodgrains to the beneficiaries in Navapur taluka | नवापुर तालुक्यात लाभार्थींना धान्य वितरण

नवापुर तालुक्यात लाभार्थींना धान्य वितरण

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नवापुर तालुक्यातील तीन गावांमध्ये ७४ आदिवासी लाभार्थी कुटूंबांना आदिवासी विकास विभागाकडून मोफत धान्याचे वितरण करण्यात आले़ एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय नंदुरबार आणि आदिवासी विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला़
यावेळी आमदार शिरीष नाईक, प्रकल्पाधिकारी वसुमना पंत, सहायक सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी प्रदीप देसाई, किरण मोरे, बी़एफ़वसावे, कार्यालयीन अधिक्षिका शिरसाठ उपस्थित होते़ आदिवासी विकासमंत्री अ‍ॅड़ के़सी़पाडवी यांच्याकडून १ मे पासून सुरु करण्यात आलेल्या या योजनेंतर्गत नवापुर तालुक्यातील नवागाव येथे ३०, आमलाण येथे २८ तर पाटी बेडकी येथे १६ लाभार्थी कुटूंबांना मोफत धान्य देण्यात आले़ कोणत्याही प्रकारची शिधापत्रिका नसलेल्या या कुटूंबांना प्रत्येकी १० किलो मोफत गहू देण्यात आला़ नंदुरबार प्रकल्प कार्यालयाने या योजनेंतर्गत कार्याक्षेत्रातील तीन तालुक्यात १ हजार ५०० कुटूंबांना मोफत धान्य दिले आहे़ येत्या काळात नंदुरबार, शहादा आणि नवापुर तालुक्यातील २ हजार कुटूंबांना धान्याचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी वसुमना पंत यांनी दिली़
नंदुरबार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत येणाऱ्या विविध गावांमधील ज्या आदिवासी कुटंूबांकडे शिधापत्रिका नाहीत अशा कुटूंबांना नोंदणी करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत़ तालुकास्तरावर तहसील कार्यालयांमध्ये या नोंदण्या होत असल्याची माहिती देण्यात आली आहे़ यशस्वीतेसाठी कार्यक्रम समन्वयक राहुल ईदे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले़

दरम्यान तळोदा प्रकल्प कार्यालयामार्फत प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अविशांत पांडा यांच्या मार्गदर्शनाखाली धडगाव तालुक्यात आज ३७७ कुटुंबांना धान्य वाटप करण्यात आले आहे़ तळोदा प्रकल्प कार्यालयाकडूनही लाभार्थींची माहिती घेऊन त्यांना धान्य वितरण करण्यात येत आहे़

Web Title: Distribution of foodgrains to the beneficiaries in Navapur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.